ताज्याघडामोडी

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादीची पुर्वआढावा व पुर्वतयारी विचारविनीमय बैठक संपन्न

पंढरपूर(प्रतिनिधी):- १६९ कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प असलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनषंगाने पुर्वआढावा व पुर्वतयारी बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी कॅाग्रेसने केले होते. त्यास पंढरपूर शहरातील प्रत्येक वार्डातील अनेक प्रतिनिधी हजर होते. बैठकीत निवडणुकीची पुर्वतयारी म्हणून साधकबाधक चर्चा करुन निवडणुकीचे पक्षीय धोरण निश्चित करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, २०२१ मध्ये पंढरपूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीच्या वतीने निवडणुकीची पुर्वतयारी म्हणून आढावा बैठकीचे आयोजन राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी जाणीवपुर्वक दुही न माजवता एकजुटीने काम करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष संदिप मांडवे यांनी केले. तर आगामी निवडणुका सर्व ताकतीनिशी लढण्याचे संकेत चंद्रभागा साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी दिले.
मनसेच्या दिलीप धोत्रे यांनी कोणाच्याही दबावाला न भितां आपण नगरपालिका जिंकण्याची हमी दिली. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांनी १६९ कोटी वार्षिक ताळेबंद असलेल्या पंढरपूर नगरपालिकेचा जाहीर लेखाजोखा मांडून, नगरपालिकेच्या माध्यमातून स्वत:चा विकास केलेल्या सत्ताधीशांची लक्तरे वेशीवर मांडून, वस्तुस्थिती समोर आणली. आज रक्षाबंधन दिनानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेस चारुशीलाताई कूलकर्णी व राधाताई मलपे महिला कार्यअध्यक्ष सौ रंजनाताई हजारे, सौ साधनाताई राऊत ,सौ संगीताताई माने यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना राखी बांधून नगर परिषदेवर राष्ट्रवादी व महा विकास आघाडी व मित्र पक्ष सामाजिक संघटना यांना झेंडा फडकवण्याची मागणी युवती व महिला पदाधिकारी यांनी केले
            निवडणुकीत गटबाजी झाल्यास पक्षाच्या सबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई करणार असल्याचे तालुकाध्यक्ष विजय देशमुख यांनी सांगितले. तसेच सर्व ताकदीने लढण्याची तयारी असल्याचे युवकचे सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
          यावेळी  प्रमुख उपस्थिती कल्याणराव काळे, सुभाष दादा भोसले, दिलीप बापू धोत्रे ,संदीप दादा मांडवे ,मारुतीराव जाधव सर,आप्पासो थिटे, नागेश भाऊ फाटे, किरण घाडगे ,विजय देशमुख ,संजय बंदपट्टे ,अनिल सप्ताळ, , दिगंबर सुडके, दिलीप साबळे, श्रीकांत शिंदे ,विजय मोरे, आनंद कथले, सुहास म्हमाणे, प्रवीण शिंदे ,ओंकार चव्हाण, अण्णा पवार, प्रकाश पवार, सतीश अप्पा शिंदे ,सलीम मुलानी, सुभाष बागल ,मोहम्मद उस्ताद ,जयंत भंडारे सर, सौ रंजनाताई हजारे, सौ साधनाताई राऊत ,मनोज आदलिंगे ,सौ संगीताताई माने, चारुशीला कुलकर्णी ,राधाताई मलपे ,शुभांगी ताई ,सौ वनिता ताई बनसोडे, सौ छाया ताई खंडागळे, दिलीप साबळे, जानबा माने ,कैलास करंडे ,कालिदास देशमुख,  आनंद शिंदे नाईक, अमर सूर्यवंशी, दत्ता भोसले, धनु लकडे ,कालिदास जवारे ,जयवंत भोसले ,बाळासाहेब कांबळे ,रामचंद्र खडके ,सागर रोकडे ,कोमल गायकवाड, पूजा कोळी, रवि गायकवाड ,गणेश भोसले, रोहन तारापूरकर ,शोभा ननवरे, अण्णा गांडूळे, चंद्रकांत पवार ,दत्तात्रय माने, राऊफ बागवान, नासीर बागवान, सुमीत शिंदे ,संदीप मुटकुळे ,सागर पडगळ, प्रणव गायकवाड ,राकेश साळुंखे ,विक्रम बागल, भारत नागणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी महाविकासआघाडी चे पदाधिकारी मनसेचे नेते नगरपरिषदेचे माजी माजी नगरसेवक व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी महिला पदाधिकारी बहुसंख्येने स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

18 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

18 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago