शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना करोनाची लागण झाली आहे. अमोल कोल्हे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. विशेष म्हणजे डॉ. कोल्हे यांनी यापूर्वीच करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
ट्विटरवर खासदार डॉ. कोल्हे यांनी म्हटलं की, करोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला करोना सदृश लक्षणे दिसत आहेत. करोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा आरटीपीसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
परंतु प्रकृती स्थिर आहे.दरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.
माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की, त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे, असं आवाहनही त्यांनी केलं.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…