स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मयोगी महाविद्यालया मध्ये तीन दिवसीय “कर्मयोगी व्याख्यानमाला” संपन्न.

शेळवे : स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त कर्मयोगी अभियांत्रिकी व पॉलीटेक्निक महाविद्यालय शेळवे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.17 ते 19 ऑगस्ट दरम्यान आयोजित केलेली तीन दिवसीय आभासी “ कर्मयोगी व्याख्यानमाला” संपन्न झाली. यामध्ये प्रा. श्री लक्ष्मणराव ढोबळे, श्री विवेकजी घळसासी व ह.भ.प. श्री चैतन्य महाराज देगलूरकर या नामवंत वक्तांची मार्गदर्शनपर व्याख्याने झाली.स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रतिवर्षी अशा  व्याख्यानमालेचे आयोजन करणार असल्याची माहिती श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक यांनी दिली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सदर ची व्याख्यानमाला ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.

या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प 17 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध वक्ते प्रा. श्री. लक्ष्मणराव ढोबळे यांनी गुंफले. यामध्ये त्यांनी “मालकांचा कर्मयोग ” या विषयावर विचार मांडले. स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचे राजकीय प्रवासातील अनुभव कथन करून मालकांच्या निष्काम कर्मयोगा बद्दलच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

            नामवंत वक्ते, पत्रकार व प्रबोधनकार श्री. विवेक जी घळसासी यांनी या व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प “युवक:समाज व संस्कृति” या विषयावर गुंफले. या व्याख्यानामध्ये त्यांनी युवकांचे समाजाप्रती असणारे योगदान व कर्तव्य या वर विस्तृत प्रबोधन केले. तसेच भारतीय संस्कृतीची श्रेष्ठता टिकविण्याचे आवाहन ही त्यांनी युवकांना केले. सद्यस्थितीला भरकटत चाललेल्या युवा पिढीला त्यांनी मार्गदर्शन करून त्यांनी समाजाबद्दल चा सध्याचा संकुचित दृष्टीकोन बदलून विश्वव्यापक समजाचा दृष्टीकोन अंगीकारावा असे आवाहन केले. युवकांमधील ताकद, जोश व वेळ इतरत्र वाया न घालविता समाजाच्या उन्नतीसाठी व देशाच्या प्रगतीसाठी याचा योग्य वापर करण्याचे आवाहन ही त्यांनी युवकांना केले. तसेच युवा शक्ति ही महान शक्ति असून युवकांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे याची जाणीव ही त्यांनी युवकांना करून दिली.

             या व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प 19 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध प्रवचनकार हभप श्री. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी “कर्मातील ज्ञानयोग” या विषयावर गुंफले. त्यांनी ज्ञान योग व कर्म योग यांचे विस्तृत व स्वतंत्र विवेचन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या निरपेक्ष समाजसेवेचे व कार्यपद्धतीचे अनेक पैलू उलगडून त्यांनी मोठया मालकांचा कर्मयोग विशद केला.

सदर च्या आभासी तीन दिवसीय  व्याख्यानमालेसाठी श्रोतृवर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. तसेच सदर च्या व्याख्यानमालेसाठी माननीय आमदार श्री.प्रशांतजी परिचारक, श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक, संस्थेचे अध्यक्ष श्री. दिलीप शहा, रजिस्ट्रार जी. डी. वाळके, उमा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक, कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, उपप्राचार्य प्रा.जगदीश मुडेगावकर, कर्मयोगी पॉलीटेक्निक चे प्राचार्य डॉ. ए. बी. कणसे, कर्मयोगी अभियांत्रिकीचे संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशिष जोशी  व इ. मान्यवर उपस्थित होते. सदर ची व्याख्यानमाला ऑनलाइन पद्धतीने झूम, यू ट्यूब व फेसबूक लाईव या पद्धतीने प्रसारित करण्यात आली. सदर ची व्याख्यानमाला ऑनलाइन प्रसारित करण्याचे काम प्रा दीपक भोसले यांनी पाहिले. या व्याख्यानमालेसाठी प्रा संदीप सावेकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

21 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

21 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago