ताज्याघडामोडी

कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी

देशातून अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत देशातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा म्हणजे बूस्टर डोस द्यावा का हा प्रश्न उपस्थित होतोय.

अशातच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लसीच्या बूस्टर डोसची आवश्यकता नसल्याचं म्हटलंय.

WHOने बुधवारी म्हटलं की, सर्वप्रथम आपल्याला जगातील गरीब देशांना पूर्णपणे लसवंत करण्याबाबत विचार करणं फार गरजेचं आहे. त्यानंतरच श्रीमंत देशांच्या लसीच्या बूस्टर डोसबाबत विचार केला पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून डेल्टाच्या रूग्णांची संख्या अमेरिकेत वाढताना दिसतेय. यामुळे अमेरिकेने 20 सप्टेंबरपासून बूस्टर डोस देणार असल्याचं सांगितलं.

WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्याप्रमाणे, “कोरोनाच्या सध्याच्या आकडेवारीवरुन ही गोष्ट निश्चितच असं सांगता येऊ शकतं की सध्या बूस्टर डोसची गरज नाहीये. दरम्यान यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे.”

डब्ल्यूएचओचे वरिष्ठ सल्लागार ब्रुस एल्वार्ड म्हणाले की, “सध्या जगभरात पुरेशा लस उपलब्ध आहेत. मात्र परंतु ती योग्य क्रमाने तसंच योग्य ठिकाणी उपलब्ध नाही. संपूर्ण जगभरात कोरोनाचा धोका आहे आणि सर्वप्रथम लसीचे दोन डोस लोकांना उपलब्ध करून दिले पाहिजेत. त्यानंतर आपण बूस्टर डोस देण्याबाबत विचार केला पाहिजे.”

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago