पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात स्वत:ला जाळून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे सुरेश पिंगळे यांची प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्यावर पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पण ते जवळपास 80 टक्के भाजले असल्याने त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश यांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बनवण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचललं होतं. त्यांच्या कामासाठी टाळाटाळ होत असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
सुरेश पिंगळे यांनी टोकाचं पाऊल का उचललं?
केवळ पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही या कारणाने सुरेश पिंगळे यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गेटसमोर स्वत: ला पेटवून घेतलं होतं. दोन अडीच महिने ते खडगी पोलीस ठाणे, तसेच पोलीस आयुक्तालयात हेलफाटे मारत होते. मात्र कुठलंतरी कारण सांगून त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जात नव्हतं. त्यामुळे ते वैतागले होते. अखेर त्यांनी संतापात स्वत:ला पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पिंगळे पाषाण येथील एआरडीई येथे कंत्राटी पद्धतीने ऑफिस बॉयचं काम करायचे. त्यांचा दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट बदलायचा. तिथे दरवर्षी पोलीस व्हेरिफिकेशन लागायचं. आतापर्यंत दरवर्षी पोलीस व्हेरिफिकेश लागत होतं. दरवर्षी ते मिळत होतं. पण यावेळी त्यांना अडचण आली.
“मला न्याय हवाय. माझ्या मुलांचं मी काय करु. मला नोकरी नाही. एकतर मला नोकरीला लावावं. मला नोकरी लागली तर मुलांचं पोट भरेल. कारण नोकरीसाठीच त्यांनी आत्मदहन केलं आहे. पोलीस अधिकारी याबाबत लेखी स्वरुपात सांगत असतील आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ”, असं पिंगळे यांच्या पत्नीने सांगितलं.
मृतदेह ताब्यात घेणार नाही, पिंगळे यांच्या कुटुंबियांची भूमिका
या घटनेनंतर पिंगळे यांचे कुटुंबिय आक्रमक झाले आहेत. पोलिसांकडून जोपर्यंत आपल्या जबाबादारीची हमी देत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका पिंगळे यांच्या पत्नीने घेतली आहे. या घटनेनंतर पिंगळे यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
बुधवारी पोलीस आयुक्तालयात थरार
सुरेश पिंगळे बुधवारी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आले होते. त्यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हवं होतं. पण कदाचित त्यांना वेळेवर ते प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांनी संतापात टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी स्वत:वर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतलं. इतकंच नाही तर त्या पेटत्या अंगाने त्यांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेतली. हा सर्व थरार उपस्थित लोक पाहात होते. त्याचवेळी काहींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.
पेटत्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचं धाडस काहींना करता आलं नाही. पण काहींनी ते धाडस करुन, आग विझवली. त्यानंतर सुरेश यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दोन दिवसांच्या उपचारानंतरही सुरेश यांची प्राणज्योत मालवली. या सर्व थरारानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…