उत्तर प्रदेशमध्ये एक मन सुन्न करणारी घटना करणार घटना घडली आहे. 2 लाखांच्या कर्जाचं ओझं झाल्याने 4 चिमुकल्यांसह एका हतबल पित्याने विष घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिर्झापूरमध्ये एका वडिलांनी आपल्या चारही लहान मुलांना विष खायला दिलं. त्यानंतर स्वत: ही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये वडील आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर दोन मुलांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्या दोघांना उपचारासाठी वाराणसीच्या ट्रामा सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे.
बँकेतून दोन लाखांचं कर्ज घेतलं होतं. पण त्या कर्जाची परतफेड करणं अत्यंत कठीण होऊन बसलं होतं. आर्थिक परिस्थिती ही बेताचीच असल्याने पती पत्नीत नेहमीच वाद होत होते. याच वेळी दारूच्या नशेत असलेल्या पित्याने टोकाचं पाऊल उचललं. काशीराम परिसरात राहणाऱ्या राजेशने दारूच्या नशेच विजय, सुमन, साधना आणि धीरज या आपल्या चार मुलांना जेवणामध्ये विष टाकून खाण्यास दिलं. त्यानंतर त्याने स्वत:ही विष घेतलं. यानंतर पाचही जणांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने जवळच्या प्राथमिक केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
पाचही जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मिर्झापूर येथील रुग्णालयात जा असा सल्ला देण्यात आला. जिथे पोहचल्यावर डॉक्टरांनी राजेश आणि त्याच्या दोन मुलांना मृत घोषित केलं. सुमन आणि विजय यांचा मृत्यू झाला. तर साधना आणि धीरज यांची प्रकृती आता अत्यंत गंभीर झाली आहे.
राजेशच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, राजेशने तीन बँकांमधून जवळपास दोन लाखांचं कर्ज घेतं होतं. पण ते त्याची परतफेड करू शकत नव्हते. बँकेचे अधिकारी देखील कर्जाची वसूली करण्यासाठी घरी आले होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…