9 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात पुणे लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कारवाईचं सत्र सुरू आहे. 9 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात थेट पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांचं नाव आल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याशिवाय अरविंद कांबळे, राजेंद्र शिंदे या लिपिकांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. 9 लाख लाच प्रकरणात तब्बल 2 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचं सांगितलं जात आहे.
टेंडर मंजुरीनंतर वर्क ऑर्डर काढण्याकरिता ही लाच घेण्यात आली होती, अशी माहिती समोर येत आहे.महापालिकेत सर्व साधारण सभा सुरू असताना मारली धाड आज महापालिकेत सर्व साधारण सभा सुरू असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली होती. स्थायी समिती सभापतींच्या कार्यालयीन प्रमुखासह अन्य कर्मचा-यांना ताब्यात घेऊन एसीबीचे अधिकारी चौकशी करीत होते.
एसीबीच्या धाडेने महापालिका परिसरात प्रचंड खळबळ उडाली. सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांची चौकशी देखिल एसीबीचे अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. एसीबीच्या धाडेमुळे महापालिकेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. एसीबीच्या धाडे बद्दल महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी बोलण्यास टाळा टाळ करत आहेत. मात्र विरोधी पक्षाकडून सत्ताधारी भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे.
पिंपरी नितीन लांडगे लाच प्रकरणात भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांना प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. पिंपरी चिंचवड स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांची अटक निश्चित झाली असून त्यांचा सहभाग निश्चित झाला आहे, अशी माहिती राजेंद्र बनसोडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (पुणे) यांनी दिली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…