ताज्याघडामोडी

‘या’ शहरांमध्ये उद्यापासून 5 दिवस बँका राहतील बंद, आजच आटोपून घ्या बँकेचे सर्व व्यवहार

जर तुम्ही या आठवड्यात बँकेत जाण्याचा विचार केला, तर तुम्हाला तुमच्या शहरातील बँका बंद असतील.त्यामुळे जर तुमच्याकडे बँकेशी संबंधित काही तातडीचे काम असेल तर आजच ते उरकून घ्या.उद्यापासून अनेक शहरांमध्ये बँका बंद राहतील.

दरम्यान, या आठवड्यात बँकांना गुरुवार पासून म्हणजेच १९ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट यादरम्यान सलग ५ दिवसांची सुट्टी असेल. मात्र बँकांच्या या सुट्ट्या एकाच वेळी सर्व राज्यांना लागू असणार नाहीत, हे लक्षात असू द्या. प्रत्येक राज्याला वेगवेगळ्या दिवशी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. काही राज्यांमध्ये स्थानिक गरजेनुसार सुट्ट्या घोषित करण्यात आल्या आहेत.

भारतीय रिर्झव्ह बँकेने दिलेल्या अधिसूचनेनुसार, महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आणि रविवारी सर्व बँका बंद आहेत. हा नियम खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील दोन्ही बँकांमध्ये लागू आहे.
पुढील ५ दिवस कोणत्या शहरांत बँकांमध्ये कामकाज होणार नाही, हे जाणून घ्या…

1) ऑगस्ट १९ – मोहरम (अशुरा) – अगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर, रांची आणि श्रीनगर येथे बँका बंद असतील.
2) २० ऑगस्ट – मोहरम/फर्स्ट ओणम – बंगळुरु, चेन्नई, कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँक बंद असणार आहेत.
3) २१ ऑगस्ट – थिरुवोणम – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँक बंद असतील.
4) २२ ऑगस्ट – रविवार
5) २३ ऑगस्ट – श्री नारायण गुरू जयंती – कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँक बंद असणार आहेत.
बँकांच्या आगामी सुट्ट्या

आगामी सुट्ट्यांमध्ये येणारा २८ ऑगस्ट हा महिन्याचा चौथा शनिवार आहे, त्यामुळे बँका बंद राहतील. याशिवाय देशभरातील बँकांना रविवारमुळे २९ ऑगस्ट रोजी सुट्ट्या असणार आहेत. अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनौ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगर येथे ३० ऑगस्ट रोजी जन्माष्टमीमुळे बँका बंद राहतील. ३१ ऑगस्टला श्रीकृष्ण अष्टमीमुळे हैदराबादमधील बँकाचे कामकाज होणार नाही.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago