ताज्याघडामोडी

अकरावी प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम

अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे यावर्षी दहावीचा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना बहुतांश गुण मिळाले आहेत. आता न्यायालयाने अकरावीसाठी घेण्यात येणारी सीईटी देखील रद्द केल्यामुळे शहरातील नामवंत महाविद्यालयांचा कटऑफ वाढला आहे. त्यामुळे प्रवेशासाठी स्पर्धा वाढली आहे. दरवर्षी अकरावी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. परंतु औरंगाबाद शहरातील संस्थांकडून होणारी मागणी यामुळे यंदापासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन करण्यात आली आहे. तर शाळा बंद असल्याने यंदा दहावीचा निकाल हा मागील इयत्तेच्या मूल्यांकन पद्धतीनुसार जाहीर करण्यात आल्याने शासनाने सीईटी परीक्षा जाहिर केली होती. मात्र न्यायालयाने सीईटी रद्द केल्याने प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला

सीईटी रद्द झाल्याने प्रवेश प्रक्रिया सुरुळीत होईल अशी अपेक्षा शहरातील महाविद्यालयांना होती. मात्र यंदा प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गुण मिळाले आहेत. त्यामुळे विज्ञान पाठोपाठ वाणिज्य शाखेला प्रवेशाकडे ओढा वाढलेला दिसून येत आहे. असे असूनही प्रवेशाबाबत खात्री वाटत नसल्याने आणि शाळांकडून शुल्कासाठी अजून टीसी न मिळाल्याने मुल येवून चौकशी करुन जात असल्याचे महाविद्यालयांनी म्हटले आहे. पालक – विद्यार्थी यांच्यातील समज-गैरसमज दूर करण्यासाठी समुपदेशन केले जात असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.

अकरावी प्रवेश ऑनलाइन की ऑफलाइन अशी संभ्रमावस्था विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आहे. शहरामध्ये अकरावीचे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु पुढील आदेश मिळेपर्यंत प्रवेश निश्चिती करु नका अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मुलांमधील ही द्विधा मनस्थिती दूर करण्यासाठी प्राध्यापकाची समुपदेशन समिती गठीत केली असल्याचे प्राचार्यांनी सांगीतले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago