महापुरानंतर काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस राज्यभरात पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणासह अनेक भागांत सध्या मुसळधार पावसाच्या सरी बसरत आहेत. तर काही भागांत पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. राज्यातील धरण क्षेत्रातही पावसाचा जोर आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत संततधार पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र येत्या १ ते २ दिवसांत महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने वर्तवला आहे.
सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि संपूर्ण राज्यभर ४८ तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.हवामान खात्याच्या अंदानुसार, १७ ऑगस्टला औरंगाबाद, जालना, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तर १८ ऑगस्टला नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…
पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…
तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…
वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…
इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…