ताज्याघडामोडी

आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी सरकारकडून नवे नियम जाहीर; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

 देशात कुठेही गेलात तर तुमची ओळख एकाच ओळखपत्राने होण्यासाठी आधार कार्ड अत्यंत महत्वाचे मानले जाते. याच आधार कार्डात काही बदल करायचे असतील तर यासंदर्भातील नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. जर तुमचाही राहता पत्ता बदलला असेल आणि तुम्हाला आधार कार्डावर आपला बदललेला पत्ता अपडेट करायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

युआयडीएआय ( UIDAI) ने आधार कार्डा वर पत्ता बदलण्याच्या नियमांमध्ये काही प्रमाणावर सूट दिली होती. पण आता नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यापूर्वी ओळखीचा पुरावा सादर केल्याशिवाय आधार कार्डावरील पत्ता बदलणे शक्य होते. पण आता आधार कार्डावरील पत्ता बदलण्यासाठी अॅड्रेस प्रूफ असणे अत्यंत आवश्यक असणार आहे.

युआयडीएआयने काही दिवसांपूर्वी ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली. ट्वीटमधून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ओळखपत्राचा आणि पत्त्याच्या पुरावा सादर केल्याशिवाय पत्ता बदलता येणार नाही. त्यामुळे पत्ता बदलण्यापूर्वी पत्त्याच्या पुरावा सादर करावा लागणार. जाणून घेऊया आधार कार्डावरील पत्ता बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया…

* ॲानलाइन अर्ज कसा कराल?

  • सर्वप्रथम UIDAI ची अधिकृत संकेतस्थळ uidai.gov.in वर जा.
  • Proceed To Update Aadhar Card यावर क्लिक करा.
  • त्यानंतर आधारकार्डवरील 12 अंकी नंबर तिथे प्रविष्ट करा.
  • सुरक्षेसाठी समोर आलेला कॅप्चा कोड नीट टाईप करा.
  • नंतर मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपीचा पर्याय येईल त्यावर क्लिक करून आलेला कोड तिथे टाकून एन्टर करा.
  • दिलेला मोबाईल नंबर हा आधारकार्डला लिंक असावा.
  • लॉग इन केल्यानंतर आधारकार्डाची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर असेल.
    * तिथे दिलेल्या 32 ओळखपत्रांपैकी कोणतंही एक सिलेक्ट करा आणि त्याची स्कॅन कॉपी अपलोड करुन सबमिट करा.

* ऑफलाईन अर्ज कसा कराल?

  • आपल्या जवळच्या आधारकार्ड केंद्रावर जा आणि आधारकार्ड अपडेट करण्यासाठीच्या अर्जाचा फॉर्म भरा.
  • त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बायोमेट्रिक्स द्यावं लागेल.
  • ही प्रकिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल. त्यावर असलेला रिक्वेस्ट नंबर (URN) वरुन तुम्ही तुमच्या आधार कार्डाचं स्टेटस ट्रॅक करु शकता.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

17 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago