‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेवून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणसंदर्भात जी भूमिका मांडली ती चूक असून खोटं बोल पण रेटून बोल’ अशी पवारसाहेब यांची भूमिका असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 75 वर्षांतून 16 वर्षे सत्ता वजा केली तर उर्वरित राज्य तुमचं, त्यावेळी 50 टक्केच्या वर आरक्षण द्यायला कोणी हात बांधला होत का? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
ओबीसी आरक्षणावर जनगजागृती करण्यासाठी राष्ट्रवादी राज्यभर जनजागृती करणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यावर खोटं सांगण्यासाठी सभा घेतल्या तर आम्हीही पोलखोल सभा घेऊ, असं थेट आव्हानाच चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
50 टक्क्यांवर आरक्षण तुम्हाला करता आलं नाही, कारण मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण द्यायचं न्हवतं असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सर्वांना मंत्रायलयात बोलवा समोरासमोर होऊन जाऊ दे काय खरं आणि काय खोटं, असं आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांचा पवारांना टोला
शरद पवार यांचं अचानकपणे ओबीसींप्रतिचं प्रेम आज उफाळून आलं आहे, कुठलीही काम ते हेतुशिवाय करत नाहीत आणि खरा हेतु कधी दाखवतही नाहीत, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
केंद्रानं ताट वाढलंय खरे आहे. तुमचे हात पण बांधले गेले आहेत तेही खरे आहे. पण हे हात कुणामुळं बांधले गेले? केंद्रामुळे की आपल्या पई पावण्यांच्या प्रेमामुळं? उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, मुलगी, नातू यांनाचं मोठं केले आणि जेंव्हा जेंव्हा आपण सत्तेचा भाग बनलात, तेंव्हा तेंव्हा आपल्या करामतीने मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण घालवले.”अशा शब्दांमध्ये आमदार पडळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
‘जो २०११ सालचा सेन्सेस अहवाल तुम्ही आता मागताय त्यातला घोळ तुम्ही सहभागी असलेल्या मनमोहनसिंग सरकारनेच घातला आहे. भागीदारी तुमची, पाप तुमचं आणि बोंबा मात्र मोदी सरकारच्या नावानं ठोकायच्या, अशी टीका पडळकर यांनी केली आहे. मला जातीयवादी विष पसरवणाऱ्यांना हेच विचारयं तुम्हाला जात निहाय जनगणनेचा डेटा कशाला हवाय? असा सवालही पडळकर यांनी उपस्थित केला आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाकरिता तुम्हाला इंपेरिकल डेटा द्यायचाय आणि मराठा आरक्षणाबाबात आपण अजून त्यांना मागासलेले सिद्ध करण्याची कोणतीही प्रक्रीयाच सुरू केलेली नाहीये. नुसत्या भुलथापा मारायच्या आणि लोकांचं लक्ष विचलीत करायचं, ही तुमची प्रस्थापितांची करामत आज आम्हा बहुजनांना कळाल्यामुळेच जे मराठा आरक्षणाबाबत बोलताना नेहमी पळ काढत होते, अशा शरदचंद्र पवारांनांचं आज भूमिका मांडायला लागतेय.. हाच आमच्या बहुजनांचा प्रस्थापितांविरोधतला पहिला विजय आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…