आपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांनी मुलीची मान कापण्याचा प्रयत्न केला. दारूच्या नशेत मुलीच्या घरात घुसून पेपर कटरनं त्यांनी मुलीच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यातून मुलगी थोडक्यात बचावली असून पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. मुलीने केला होता प्रेमविवाह ही घटना आहे तमिळनाडूच्या थिरुप्पूर गावातली. या गावात राहणारे पुराजा हे चित्रकार म्हणून काम करतात. त्यांची मुलगी प्रियंकाचं मोहम्मद यासीन नावाच्या तरुणावर प्रेम होतं.
कपड्यांच्या कंपनीत काम करताना त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. मात्र हे संबंध प्रियंकाच्या घरच्यांना मान्य नव्हते. प्रियंकांच्या वडिलांना मोहम्मदला कधीही न भेटण्याची ताकीद देत प्रियंकाला आत्याच्या घरी नेऊन ठेवलं. पळून जाऊन केलं लग्न आत्याच्या घरी राहणाऱ्या प्रियंकानं मोहम्मदसोबत पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.
लग्न झाल्यानंतर प्रियंका मोहम्मद आणि त्याच्या कुटुंबासह सुखात राहत होती. मात्र हे लग्न मान्य नसलेल्या पुराजा यांनी मुलीला धडा शिकवण्याचं ठरवलं. एक दिवस दारूच्या नशेत ते मुलीच्या घरी आले. यावेळी घरातील सर्वजण आपापल्या कामानिमित्त घराबाहेर गेले होते.पूराजा यांनी पेपर कटर घेत मुलीच्या गळ्यावर वार करायला सुरुवात केले. मुलीला मारून टाकण्याच्या इराद्याने त्यांनी पेपर कटरने मुलीचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. यात प्रियंकाच्या गळ्याला जखम झाली मात्र तिचा जीव वाचला.
प्रियंकावर हल्ला करून पळून गेलेल्या पुराजाला पोलिसांनी अटक केली आहे. तर प्रियंकाचा आरडाओरडा ऐकून धावत आलेल्या शेजाऱ्यांनी तिला वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे तिचा जीव वाचला आहे. प्रेमविवाह या संकल्पनेलाच आपला विरोध असून आपल्या मुलीने कुणाहीसोबत प्रेमविवाह केला असता, तरी आपण तिची हत्या केली असती, अशी प्रतिक्रिया पुराजा यांनी पोलिसांना दिली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…