धाकट्या मुलाच्या मदतीने सख्ख्या आईनेच आपल्या मोठ्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाचा मृतदेह आरोपी मायलेकांनी घरातच पुरला होता. मात्र घरातील एकाच खोलीत नवीन टाईल्स पाहून आत्या आणि तिच्या नवऱ्याला संशय आला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामुळे तब्बल अडीच महिन्यांनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. हरियाणातील रोहतकमध्ये अंगाचा थरकाप उडवणारा हा प्रकार घडला.
22 वर्षीय कर्मपाल उर्फ राहुल अडीच महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याची आई आणि भावानेच हत्या करुन मृतदेह घरात पुरला आहे, अशी तक्रार राहुलच्या आत्या आणि तिच्या नवऱ्याने पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली. त्यांच्या घरातून राहुलचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
राहुल दर आठ-पंधरा दिवसांनी आपल्या आत्याच्या घरी भेटायला यायचा. मात्र दोन महिने उलटून गेले, तरी तो न आल्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आत्या आणि तिचे यजमान रोहतकजवळील सैमाण गावात त्याला भेटायला आले. तिथे एकाच खोलीत नवीन टाईल्स पाहून त्यांच्या संशयाचं खात्रीत रुपांतर झालं. त्यांनी तडक पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
पोलिसांनी फरिदाबादमधून आई, तर रोहतकमधून मुलाला अटक केली. सैमाण गावातील घराची जमीन उकरुन त्यातून राहुलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज आहे.
चंद्रपुरात मोठ्या भावाने धाकट्याला पुरलं
दुसरीकडे, टीव्हीवरील गुन्हे विषयक मालिका आणि फिल्मी पद्धतीने गुन्हे करण्याच्या योजना पाहून मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गेल्या वर्षी घडली होती. खून केल्यानंतर या निर्दयी मोठ्या भावाने लहान भावाचा मृतदेह फिल्मी स्टाईलने पुरला. चंद्रपूर शहराजवळच्या दुर्गापूर परिसरात हा धक्कादायक प्रकार उजेडात आला होता
संशोधनातून भारताला विकसित देश बनवा- डॉ. परिक्षित महाल्ले, पुणे एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ…
पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…
लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक…
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…
पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…
पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…