कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असतानाच डेल्टाच्या व्हेरिएंटन डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. डेल्टाच्या वाढत्या संसर्गानं राज्यात हाहाकार माजवला आहे. डेल्टा व्हेरिएंटची रुग्णसंख्याही हळूहळू वाढत चालली आहे. अशातच आता या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आणखी तीन विषाणू आढळले आहेत.
डेल्टा व्हेरिएंटचा तरुणांना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं असून रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. या चिंतेच्या वातावरणात आणखी भर पडली असून डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या तीन वेगवेगळ्या विषाणूंनी तज्ज्ञांची चिंता वाढवली आहे.
आता या संसर्गजन्य डेल्टा प्लस व्हेरिएंटचे तीन वेगवेगळे प्रकार समोर येत आहे. या तीन प्रकारामध्ये Ay.1, Ay.2 आणि Ay.3 यांचा शोध लावला आहे. सुरुवातीला वयोवृद्ध लोक डेल्टा व्हेरिएंटच्या कचाट्यात सापडले होते. आता हा जीवघेणा विषाणूचा तरुणांना जास्त धोका असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, तज्ज्ञांनी डेल्टा प्लस विषाणूच्या आणखी 13 उप-वंशांचा शोध लावला आहे. जो Ay.1, Ay.2 आणि Ay.3 पासून सुरू होतो आणि 13 पर्यंत आहे. डेल्टा व्हेरिएंटमध्ये म्युटेशन झाल्यावर डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार होतो. वाढत्या संसर्गानं रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे आणि मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…