ताज्याघडामोडी

पालकमंत्री भरणे यांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही

सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांच्या बाबत केलेल्या व्यक्तव्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाऊ लागल्या असून शिवसेना पक्ष प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत,त्यांच्या बाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढलेले उद्गार हे निषेधार्ह असून अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापुरात फिरू देणार नाही असा इशारा शिवसेनेचे पंढरपुर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे.

आज देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्शवभूमीवर सोलापुरात प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना पालकमंत्र्यांनी हे बेताल वक्तव्य केले आहे.या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप जिल्ह्यात सोशल मीडियावर फिरू लागताच जिल्हा शिवसेनेत संतापाची उसळली असून शिवसेना जिल्हा प्रमख संभाजी शिंदे हे आक्रमक झाले आहेत.यापुढे पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिल्यामुळे आता राष्ट्रवादी कॉग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते याबाबत काय भुमीका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

17 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago