सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर तालुक्यासह ५ तालुक्यात कडक लॉकडाऊनची अमंलबजावणी करत अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यवसायिकास आपल्या आस्थापना उघडण्यास परवानगी नाकारली आहे व जर या आदेशाचा भंग केला तर गुन्हे दाखल केले जातील असा इशाराही दिला आहे.
पंढरपुर शहरात लागू करण्यात आलेल्या आदेशा विरोधात शहरातील काही व्यापारी आणि दुकानदार यांनी विरोध दर्शविला.तर राजकीय पातळीवरूनही हा आदेश मागे घेतला जावा म्हणून दबाब आणला गेला मात्र सारे प्रयत्न व्यर्थ ठरले आणि शहरात आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली.तरीही काही दुकानदार आपली दुकाने उघडी ठेवत असल्याच्या कारणास्तव कारवाई करण्यासाठी शहर पोलिसांचे शहरात पेट्रोलींग सुरू झाले असून काल १४ ऑगस्ट रोजी शहरातील तीन दुकानदाराविरोधात शहर पोलिसांनी मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधीकारी सो सोलापूर यांचा आदेश जा. क्र. 2021/ डीसीबी/ 02/आरआर/3788 दि. 08/08 /2021 अन्वये आदेशाचे उलंघन केल्याच्या कारणावरून गुन्हे दाखल केले आहेत.
या बाबत पो.कॉ.विनोद पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार १) साईप्रसाद ट्रेडर्स नगरपालिकेसमोर पंढरपुर २) सागर ग्लास झेंडा चौक नवी पेठ पंढरपुर ३) पांडुरंग कम्युनिकेशन मोबाईल शाँपी सावरकर चौक या तीन आस्थपणाच्या चालका विरोधात सदर कारवाई करण्यात आली आहे.या घटनेने पंढरपुर शहरातील व्यापारी वर्गात मात्र मोठी खळबळ उडाली असून त्यामुळे अर्धे शटर उघडे ठेवत व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांनीही आपले दुकाने बंद ठेवणेच पसंत केले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…