गुन्हे विश्व

पत्नीने पतिवर केले कात्रीने वार

पिऊन रोज घरी येणे आणि पत्नीला मारहाण करणे, पतीला चांगलेच महागात पडले आहे. यामुळे वैतागलेल्या पत्नीने तिच्या पतीवर कात्रीने जीवघेणा हल्ला केला आहे. रस्त्याच्या मध्यभागी या पती-पत्नीमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अकोला शहरातील ही घटना आहे.

पत्नीने हल्ला करुन पतीला जखमी केले आहे. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. लोकांनी संतापलेल्या महिलेला पतीजवळून दूर केले. तरीही महिला पतीवर कात्रीने वार करण्याचा प्रयत्न करत होती.लोकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातून घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघांना पकडून पोलीस ठाण्यात नेले, जखमी पतीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच त्या दोघांचे कुटुंबिय माहिती मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यात आले. दोघांमध्ये समझोता केल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्यांना त्यांच्यासोबत घरी नेले

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

23 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago