ताज्याघडामोडी

पुण्यातून देशातील 21 शहरांसाठी विमानसेवा; 20 ऑगस्टपासून प्रारंभ

पुण्यातून आता देशातील 21 शहरांसाठी विमान सेवा सुरु होणार आहे. इंडिगो या विमान वाहतूक कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार दर सोमवारी आणि शुक्रवारी पुण्याहून अमृतसरसाठी विमान सुटेल. अमृतसरसाठी 20ऑगस्टपासून तर रांची आणि तिरुअनंतपुरमसाठी 21 ऑगस्टपासून पुण्यातील लोहगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल.

तर दुसरीकडे कोल्हापूर ते नागपूर या विमानसेवेचाही प्रारंभ होणार आहे. याशिवाय, कोल्हापूर ते अहमदाबाद ही विमानसेवाही लवकरच सुरु होईल. आठवड्यातून तीनवेळा कोल्हापुरहून अहमदाबादसाठी विमान सुटेल. या विमानसेवांसाठीच्या ऑनलाईन बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा आता दररोज उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही विमानसेवा सुरु व्हावी म्हणून भरपूर प्रयत्न केले होते. अखेर चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. 

या अगोदर टू जेटची आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरु होती. ही विमानसेवा तूर्तास तशीच राहणार असून बाकी राहिलेल्या चार दिवसांत टु जेटचे विमान सकाळी पावणे दहा वाजता अहमदाबादवरुन निघेल. ते विमान अकरा वाजता जळगावला पोहोचेल आणि साडे अकरा वाजता तेच विमान जळगाववरुन निघून पावणे एक वाजता मुंबईत पोहोचेल.मुंबईतून 1 वाजून 25 मिनिटांनी निघणारं विमान नांदेडमध्ये तीन वाजता येईल. साडे तीन वाजता हे विमान परत एकदा मुंबईच्या दिशेने प्रयाण करेल तेच विमान मुंबई विमानतळावरुन पोहोचून साडे पाच वाजता जळगावच्या दिशेने प्रयाण करेल. त्यानंतर 7 वाजून 5 मिनिटांनी जळगाववरुन निघून रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी हे विमान अहमदाबादला पोहोचेल.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

16 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago