पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे मंत्रीपद गमवावे लागलेले शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्या मागे लागलेली शुक्लकाष्ठ संपता संपत नाहीयेत. एका महिलेने संजय राठोड यांनी आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केल्याने संजय राठोड पुन्हा अडचणीत आले आहेत. ही महिला आज शनिवारी घाटंजी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी आली होती.
संबधित महिलेने यवतमाळ येथील पोलीस अधिक्षकांना पत्र पाठवले आहे. त्यात तिने संजय राठोड यांनी पतीला नोकरीवर ठेवण्याच्या मोबदल्यात आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केली आणि आपला शारीरिक व मानसिक छळ केला असे गंभीर आरोप तिने केले आहेत. शनिवारी ही महिला आपल्या कुटुंबीयासह घाटंजी पोलीस ठाण्यात आली होती.यावेळी तिचा जबाब घेण्यात आला. याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे संजय राठोड यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. कोणीतरी माझी राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी जाणूबुजून मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचे राठोड यांनी म्हटले . तसेच त्यांनी महिलेने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, याप्रकरणात विशेष तपास पथक काय करते याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…