कर्मयोगी फाउंडेशन व युटोपियन शुगर्स यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धेय कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त व युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपियन शुगर्स येथे मोफत कोरोना लसीकरण शिबीर घेण्यात आले,यावेळी कर्मयोगी फाऊंडेशन चे प्रमुख ?षीकेश परिचारक यांच्या शुभहस्ते कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक सी.एन.देशपांडे यांचे सह कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शासनाने जाहीर केलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व साखर कारखान्यातील कर्मचा-यांना प्राधान्याने लस घेणे बाबत सूचीत केले असल्याने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ?षीकेश परिचारक म्हणाले की,कोरोंना महामारी पासून वाचण्यासाठी लसीकरण अतिशय महत्वाचे आहे कोरोनाचा मुकाबला होण्यासाठी लसीकरण होणे गरजेचे आहे.परंतु,लसीच्या तुटवडयामुळे ते शक्य होत नाही. हे लक्षात घेऊन कर्मयोगी फाऊंडेशन व युटोपियन शुगर्स ने मोफत लसीकरण हा उपक्रम राबविला आहे. देशातील १००% नागरिकांचे लसीकरण झाले तर आपण निश्चितपणे कोरोना संकटातून बाहेर पडणार आहोत.विविध ठिकाणी लस उपलब्ध केल्यास लोकांचे लसीकरण वेगाने होईल.परंतु,लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी झाल्याने वेळेत लस मिळत नाही.बराच वेळ रांगेत उभे राहावे लागून मनस्ताप होतो.त्यामुळे मोफत लसीकरण मोहीम हा स्तुत्य उपक्रम आहे.सर्वांनी योग्य ती खबरदारी “माझे कुटुंब- माझी जबाबदारी” या प्रमाणे आवश्यक ती उपाय योजना करावी असे प्रतिपादन ही ऋषिकेश परिचारक यांनी केले
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…