जगभरामध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण जनजीवन ठप्प झाले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन घोषीत करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. सध्या कोरोनाचा प्रसार ओसरताना दिसत आहे. यामुळे काही राज्यातील तसेच जिल्ह्यातील निर्बंध शिथील करण्यात आले आहे. तसेच देशभरात कोरोना लसीकरण मोहीमेला जोर आल्याने रुग्ण संख्येतही घट होत आहे. याचदरम्यान आता देशात ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा पर्यटकांना तसेच प्रवाशांसाठी आंतरराज्य प्रवास कताना आरटी-पीसीआर चाचणी करण्याची तसेच त्यांना प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक नसेल असा आदेश केंद्रीय पर्यटन विभागाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे. सध्या मुंबई, पुणे, चेन्नई मधून पश्चिम बंगालला जाणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. तसेच कर्नाटक , छत्तीसगढ,गोवा यांसारख्या राज्यातही प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी करुनच प्रवेश देण्यात येत असल्याने प्रवाशांना कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.
आंतरराज्य प्रवास करणाऱ्या नागरिकांना कोरोना काळात राज्य सरकारतर्फे लागू करण्यात आलेल्या नियमावलींचे पालन करणे बंधनकारक असल्यामुळे अनेकांना कोरोना व्हायरसचा प्रसार कमी होऊन देखील नियमावलीमुंळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशी माहिती पर्यटन व्यावसायिकांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिली. ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोनही डोस घेतले आहेत, त्यांना पुन्हा एकदा कोरोना चाचणी म्हणजेच आरटी-पीसीआर टेस्ट करायला न लावता इतर राज्य आपल्या हद्दीत प्रवेश देत आहेत. तसेच काही राज्यात वेगळे नियम लागू करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांच्या तसेच पर्यटकांच्या मनात संभ्रमाचे वातारवण निर्माण होत आहे.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना पत्र लिहले आहे की, कोरोना काळात सर्व राज्य सरकारने नागरिकांच्या प्रवेशाबाबत समान नियमावली तयार केली तर पर्यटकांना व प्रवाशांच्या मनात संभ्रम निर्माण होणार नाही. तसेच राज्यांसाठी समान नियम तयार करण्यासाठी केंद्र सरकार, केंद्रीय पर्यटन खाते,नागरी हवाई वाहतूक खाते यांची एक संयुक्त बैठक होणार आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…