पंढरपूर;(दि 12):- तहसिल कार्यालय पंढरपूर येथे तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत 57 प्रकरणे समीतीच्या सभेत मंजूर करण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे 31 प्रकरणे व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे 26 प्रकरणे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.
राज्यशासनामार्फत संजय गांधी निराधार योनेत निराधार, वृध्पकाळ, अपंगत्व, विधवा, दुर्धर आजार व मानसिक आजाराने ग्रस्त नागरिक तसेच श्रावणबाळ योजनेत 65 वर्षावरील वृध्द निराधार व्यक्तींना लाभ दिला जातो. या योजनेचा तालुक्यातील जास्तीत जास्त गरजू व पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.असे आवाहनही तहसिलदार बेल्हेकर यांनी केले.
समीतीच्या सभेत ज्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत त्यांनी बँक पास बुकची छायाकिंत प्रत व फोटो तात्काळ तहसिल कार्यालय पंढरपूर येथे जमा करावेत असेही तहसिलदार बेल्हेकर यांनी सांगितले
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…