प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार

 पंढरपूर दि. 11 :- सोलापूर  जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा आणि माढा पाच तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस  वाढता आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  निर्बंध  आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी आज केले.

सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे कोरोना निर्बंधाबाबत  तालुक्यातील पदाधिकारी, व्यापारी व नागरिक यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात होते. बैठकीस अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी पिसे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, पोलीस निरिक्षक अरुण पवार, किरण अवचर तसेच पदाधिकारी, व्यापारी, नागरिक आदी उपस्थित होते.

   राज्यात सोलापूर, नगर, बीड  जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.  सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा आणि माढा  तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस  वाढता आहे. कोरोनाच्या पहिल्या  व दुसऱ्या लाटेचा  परिणाम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला होता. संभाव्य येणारी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे.  प्रशासनाची भूमिका ही सर्वसमावेशक आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यात संसर्ग होऊ नये  तसेच संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्हा प्रशासनाकडून  फौजदारी  प्रक्रिया संहिता 73 चे कलम 144 नुसार निर्बंध लागू करण्यात आले  असल्याचे  अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव  यांनी सांगितले.

 प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही श्री.जाधव यांनी सांगितले. 

 कोरोना संसर्गाच्या  पाहिल्या व दुसऱ्या लाटेच्या कालावधीत  जिल्ह्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी  प्रशासनास सहकार्य केले आहे. सध्या काही ठिकाणी दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची वाढती रुग्ण संख्या तसेच  संभाव्य येणारी तीसरी लाट पाहता प्रशासनास प्रतिबंधात्मक  कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्रशासनाने ‍दिलेल्या सूचनाचे पालन करावे, अशा सूचना अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल  झेंडे यांनी दिल्या.

 यावेळी तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी  तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती दिली तर  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले यांनी तालुक्यातील कोरोना रुग्णांची तसेच रॅपिड अँटीजेन  तपासणी व लसीकरणाबाबत माहिती दिली.

पंढरपूर शहर व ग्रामीण भागाबाबत वेगळा निर्णय घ्यावा, वेळ वाढवावा तसेच कर माफ करावा आदी मागण्या यावेळी  व्यापाऱ्यांनी मांडल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

2 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

6 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

7 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago