सांगोला:येथील फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये राष्ट्रीय शेक्षणिक धोरण २०२० या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनार साठी प्रमुख मार्गदर्शन म्हणून केबीएन युनिव्हर्सिटी कलबुर्गी येथील डॉ. विशालदत्त कोहीर ऑनलाईन उपस्थित होते. त्यांचे स्वागत महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. साहेबगौडा संगनगौडर यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांना फॅबटेक महाविद्यालया बद्दलची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली. हा वेबिनार संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री. भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक प्रा. अमित रुपनर, संचालक दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय आदाटे यांच्या उपस्थतीत आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना डॉ. कोहीर यांनी पारंपरिक साक्षरतेच्या व्याख्येमध्ये बदल करण्याची गरज असून माहिती तंत्रज्ञान , प्रसार माध्यमे व पेपरलेस कामकाज याबदलचे ज्ञान असणारा विद्यार्थी २१ व्या शतकात साक्षर असल्याचे सांगितले. तसेच देशाची ३० टक्के आर्थिक प्रगती संशोधन व शैक्षणिक धोरणावर अवलंबून असल्यामुळे ज्या देशाचे शैक्षणिक धोरण मजबूत आहे, असा देशच आर्थिक प्रगती करत असल्याचे दाखले देताना डॉ. कोहीर यांनी चीन, जपान, जर्मनी, अमेरिका कोरिया या देशातील शैक्षणिक धोरणावरील खर्च भारताच्या तुलनेत जास्त असल्यामुळे ते देश अधिक प्रगती करत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे,पॉलीटेक्नीकचे प्राचार्य प्रा. शरद पवार,फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या सांख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. साहेबागौडा संगनगौडर यांनी केले व आभार प्रदर्शन आर्टिफिशियल इंटीलिजन्स विभागाचे प्रमुख डॉ. तानाजी धायगुडे यांनी केले.