ताज्याघडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही-ना.नवाब मलिक

महाविकास आघाडी आगामी राज्यातील 14 महानगरपालिका निवडणुकांमध्ये होईलच असे नाही. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत, अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

नवाब मलिक याबाबत अधिक बोलताना म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत, अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही. तेथील स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार आहे. या निवडणुका स्थानिक परिस्थितीनुसार होणार आहेत.

तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही. अशी पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

भाजपचे अस्तित्व काही ठिकाणी नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी-शिवसेना लढत होणार आहे. ज्याठिकाणी दोन पक्षाची, तीन पक्षाची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल ती परिस्थिती बघून निर्णय होणार असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान एका धर्माच्या विरोधात राज्य सरकार काम करत असल्याचा भाजपचा आरोप असेल तर मग मोदीसाहेब बोलत आहेत, ते सर्व धर्माच्या विरोधात बोलत आहेत का? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे, तो धुडकावण्याचे काम जनतेने करावे का? अशी भूमिका भाजप आमदारांची असेल तर त्यांना विधानसभेच्या सदस्यपदावर राहण्याचा अधिकार नसल्याची स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली आहे.

नवाब मलिक यांनी भाजप आमदांराच्या या भूमिकेवर जोरदार प्रहार केला आहे. जो सर्वोच्च न्यायालयाचा आदर करत नसेल, स्वतःच्या पक्षाच्या नेत्याचे ऐकत नसेल त्यांचे लोक किती ऐकतील असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. मन की बातमध्ये देशाचे पंतप्रधान भविष्यात सण येत असताना गर्दी होणार नाही याची सरकारने काळजी घेतली पाहिजे, असे सांगत होते. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने सणासुदीला गर्दी करु नका याची दक्षता राज्य सरकारने घेतली पाहिजे, असे निर्देश दिले होते. असे असताना भाजपचे आमदार अशी वक्तव्य करत असल्यामुळे नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न; नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज,…

1 hour ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 month ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

1 month ago