लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. या दरम्यान नववधू आणि नवरदेव फोटोशूट नक्कीच करताना दिसतात. परंतु लग्नामध्ये फोटोशूट करणे एकाच्या जिवावर बेतले. करंट लागल्याने नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने क्षणात आनंदाचे वातावरण दु:खात बदलले.
‘द मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझिलच्या एका शहरामध्ये ही घटना घडली आहे. येथे एका डेनिस रिकार्डो फारिया गुरगेल नावाच्या डॉक्टरचे लग्न ठरले होते. लग्नाआधी तो आपल्या नववधूसोबत फोटोशूट करत होता. या दरम्यान संपुर्ण फोटोग्राफी टीम उपस्थित होती. जीवनातील आनंदाचा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी फोटोग्राफर आणि कपलने सर्व तयारी केली होती.
नववधू आणि नवरदेव भारी कपडे घालून तयार झाले होते. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मात्र फोटोशूट दरम्यान डॉक्टरने एका लोखंडी रॉडला हात लावला. या रॉडमुळे त्यांना हाय होल्टेड विजेचा करंट लागला. काही समजायच्या आत नवरदेव जाग्यावर कोसळला आणि गतप्राण झाला.
उपस्थितांनी फायर ब्रिगेड आणि रुग्णवाहिकेला फोन करून घटनास्थळी बोलावले. मात्र रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचू पर्यंत डॉक्टराचा मृत्यू झाला होता.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…