राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असतानाच व मुंबई सारख्या महानगरात रात्री १० वाजेपर्यत सर्वच व्यवसाय सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली असतानाच,पुणे शहरात व्यापारी वर्ग प्रशासनाचे आदेश झुगारून रात्री ७ पर्यत दुकाने उघडी ठेवण्यावर ठाम रहात आंदोलन करीत असतानाच पंढरपूर शहरातील दुकानदार छोटे मोठे व्यवसायिक मात्र पुन्हा कडक लॉकडाऊन आणि संचार बंदीच्या चर्चेने मात्र धास्तावले असल्याचे दिसून येत आहे.पंढरपूर,माळशिरस,माढा,सांगोला आणि करमाळा तालुक्यात नवे निर्बंध लागू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी शंभरकर यांनी तयार केला असून जिल्हयाचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या बाबत निर्णय घेताना लोकप्रितिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते.मात्र या बाबत लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री यांच्यात काय चर्चा झाली याची माहिती गुलदस्त्यातच आहे.
आज रविवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी वरील ५ त्यालुक्यातील नव्या निर्बंधाबाबतच आदेश काढणार असल्याचे वृत्त असतानाच व्यापारी वर्गात मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसात पंढरपूर तालुक्यातील दररोज नव्याने आढळणारी कोरोना बाधितांची संख्या शंभरच्या आसपास जाऊ लागली आहे.याच वेळी शहरात मात्र कोरोना रुग्णाची संख्या फारशी वाढताना दिसून येत नाही.सध्या जवळपास हजार कोरोना बाधित उपचार घेत असून तालुक्याच्या गामीण भागात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे प्रशासन मात्र चिंतेत असल्याचे दिसून येते.
जिल्हाधीकारी मिलिंद शंभरकर आज काय आदेश देतात आणि लोकप्रतिनिधी या बाबत काय भूमिका घेतात याकडे आता पंढरपूरकरांचे लक्ष लागले असल्याचे दिसून येते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…