मार्च महिन्याच्या सुरुवातीस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस राज्यात सुरुवात झाली अशातच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आणि पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजविण्यास सुरुवात केली.शहरातील सर्वच कोविड हॉस्पिटलमधील बेड फुल्ल झाले आणि कोरोना बाधितांना उपचारासाठी अक्षरश सांगली कोल्हापूर कडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणे भाग पडले.मे महिन्याच्या सुरुवातीस तर दरदिवशी ५०० शेच्या आसपास कोरोना बाधित आढळून येऊ लागले.होते दर दिवशी मृतांचा आकडाही धडकी भरविणारा होता.मात्र जून महिना अखेरीस हि संख्या मोठ्या प्रमाणात घटत गेली आणि पंढरपुर शहर तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबरोबरच निर्माण झालेली भीतीची लाट हि ओसरत गेली.लॉकडाऊन शिथिल केला गेला आणि नागिरक पुन्हा बिनधास्त वावरू लागले.याच काळात तज्ञ् कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देत होते पण तो फारसा गंभीरतेने अजूनही घेतला जात नसल्यानेच आता पंढरपुर शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा मोठ्या वेगानेव वाढू लागली असून उपचाराआधीन कोरोना बाधितांची संख्या १ हजाराच्या पुढे गेल्याचे आजच्या अहवाला वरून स्पष्ट होत आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरात नव्याने ११ तर तालुक्यात ११५ कोरोना बाधितांची भर पडली आहे.तर ग्रामीण भागातील २ व्यक्ती कोरोनामुळे मयत झाले आहेत.तर तर आजच्या अहवालानूसार शहर आणि तालुक्यातील १०११ कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत.जर पंढरपूर शहर तालुक्यातील हि रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर शहरातील सर्व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटर पुन्हा भरू लागतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.सध्या सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पंढरपुर,माळशिरस हे दोन तालुके पुन्हा कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहेत.त्यामुळे जिल्हा प्रशासनही या तालुक्यात पुन्हा निर्बंध लादण्याची तयारी करत असतानाच जिल्हयाचे पालकमंत्री ना.भरणे यांनी लोकप्रतिनिधीशी चर्चा या बाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे.मात्र नागिरकांनीही दक्षता नाही घेतली तर शहर व तालुक्यात वाढत चाललेली कोरोना सक्रिय बाधितांची संख्या निश्चितपणे प्रशासनास कठोर निर्णय घेण्यास भाग पाडेल असेच वाटते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…