ताज्याघडामोडी

लक्ष्मण ढोबळेंनी राजकीय अस्तित्वाचा शोध घ्यावा नितीन नागणे यांची प्रा.ढोबळेंवर खरमरीत टीका

लक्ष्मण ढोबळेंनी राजकीय अस्तित्वाचा शोध घ्यावा
नितीन नागणे यांची प्रा.ढोबळेंवर खरमरीत टीका
पंढरपूर –
राजकीय अस्तित्व संपलेल्या प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले असून फुकटची प्रसिध्दी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न लक्ष्मण ढोबळे यांनी केला असून शिंदे साहेबांवर टीका करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे असून बिनबुडाचे आरोप करू नयेत अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाणार असल्याची प्रतिक्रिया सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी दिलेली आहे.
दोन दिवसांपूर्वी प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी सुशिलकुमार शिंदे साहेबांवर टीका केली होती त्याला आता जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेले आहे.
वास्तविक पाहता साधे शिक्षक असणाऱ्या ढोबळे यांच्यावर शिंदे साहेब व पवार साहेबांनी उपकार केल्यामुळेच त्यांनी आजपर्यंत इथवर मजल मारलेली आहे याचा त्यांना विसर पडलेला आहे. केवळ आणि केवळ शिंदे साहेब व पवार साहेब यांच्या जीवावर आजपर्यंत आमदार व मंत्रीपद भोगलेल्या लक्ष्मण ढोबळे यांना भाजपामध्ये जावूनही कोणत्यावर पदावर घेतलेले नाही त्याचे शल्य त्यांच्या मनात असून उठसूठ कुणावरही टीका करायची आणि प्रसिध्दीच्या झोतात राहायचे हेच काम  आता ढोबळे यांना राहिले असून कारण जोपर्यंत आपण कोणत्या मोठ्या नेत्यावर आरोप करणार नाही तोपर्यंत कोणत्या पदावर संधी मिळणार नाही असा भाजपचा अजेंडा असल्यामुळेच खासदारकीचे डोहाळे लागलेल्या ढोबळे यांनी शिंदे साहेबांवर टीका केली असल्याचे रोखठोक उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी दिले असून असे खोटे बोलण्यामुळेच मोहोळच्या जनतेने लक्ष्मण ढोबळे यांना तोंडावर पाडले हे विसरू नये.
चौकट-
बलात्काराच्या आरोपानंतर अटक टाळण्यासाठी ढोबळेंनी भाजप नेत्यांचे तळवे चाटले – नितीन नागणे
पुरोगामित्वाचा विचार मांडणाऱ्या प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी बलात्काराच्या आरोपानंतर त्यांना होणारी अटक टाळण्यासाठी भाजप नेत्यांचे तळवे चाटले असून शिंदे साहेबांवर आरोप करण्याआधी आपण किती धुतल्या तांदळातील आहोत याचा विचार करावा.  विशेष म्हणजे ढोबळे यांच्यावर बलात्काराचा आरोप असून शिंदे साहेबांवर खोटे आरोप करू नयेत अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी दिलेला आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago