सध्याच्या जमान्यात व बदलत्या काळानुसार उद्योग क्षेत्रातील पुणे, मुंबई, नागपुर, बेंगलोर व नवी दिल्ली इ. सारख्या शहरात विद्यार्थ्यांनी नवकल्पना आत्मसात केल्यास नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या अद्यावत क्षेत्राचा अभियांत्रिकीमध्येच समावेश करणे ही स्पर्धात्मक क्षेत्राची निकड ओळखून फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगोला येथे बी.टेक. डिग्रीसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजिन्स अँड डेटा सायन्स शाखेस अखिल भारतीय तंत्रक्षण परिषद , नवी दिल्ली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे यांनी या शैक्षणिक वर्षापासून६० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेस ग्रामीण भागात प्रथमतच मान्यता दिल्याची माहिती, संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर श्री. भाऊसाहेब रूपनर व प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे यांनी दिली आहे.
एआय असलेल्या स्मार्ट मशीन मानवाप्रमाणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते. कृत्रिम बुध्दिमत्ता प्रणाली मशीन लर्निगचा वापर मशीनला डेटामधून स्वयंचलितपणे कार्य करण्याची परवानगी देते. डेटा सायन्स हे माहिती तंत्रज्ञान व अप्लाइड सायन्स यांचा एकत्रित परिणाम म्हणता येईल, ज्यामुळे उद्योगांच्या दृष्टीकोनातून डेटा छाननी करणे त्याचे प्रारूप ठरवणे, विश्लेषण करणे आणि तो सादर करणे सुलभ होते.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स चा वापर दैनंदिन जीवनात:- उद्योग क्षेत्र:- रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमशीन सारख्या अत्यंत पुनरावृत्तीय कार्य विचारात घेऊन एआय प्रणाली वेगवान आणि सहजतेने कामगिरी करते व वेळ, ऊर्जा, श्रम यांची बचत होते. कृषी क्षेत्र:- एआय युक्त यंत्रे वनस्पतीच्या पानांमधील किरकोळ बदलही टिपून शेतकऱ्यांना पिकावर कोणता परिणाम होईल हे सांगू शकतात. शेतकऱ्यांनी कधी पेरणी करावी आणि कधी खत घालावे याची प्रक्रिया करणे डीप लर्निगच्या वापरामुळे मिळते. विमान वाहतूक:- जगभरातील विमानांची वाहतूक कॉम्प्युटरवर अवलंबून आहे. कोणते विमान कधी व कोणत्या मार्गाने जाईल हे माणूस ठरवू शकत नाही, हे सर्व यंत्रेच सांगतात.प्रवाशांचे साहित्य विमानातून बाहेर आणण्यापर्यंतचे सर्व निर्देष अशा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असलेल्या यंत्रांच्या सहाय्यानेच दिले जात असतात. आरोग्य क्षेत्र:- आरोग्य विभागात मशीन लर्निग ही प्रणाली रूग्णांच्या वेगवान, स्वस्त आणि अचूक निदान करण्यासाठी परिणामक ठरत आहे. एक्सरे, टेम्परेचर व ऑक्सिजन पाहून हे अँप सामान्य न्यूमोनिया आणि कोव्हिड-19 मधील फरक सांगते, महाराष्ट्र सरकारने याचा वापरही केला आहे. तसेच कोरोना काळात आंध्रप्रदेश आणि तेलंगणाच्या दुर्गम परिसरांमध्ये ड्रोनच्या सहाय्याने औषधे पोहोचवण्यात येत आहेत.
या उदाहरणांमधून कृत्रिम बुध्दिमत्ता अँड विज्ञान हे कॉम्प्युटर सायन्सचे सर्वात आकर्षक व काळाची गरज आणि वेगाने वाढणारे क्षेत्र असल्याचे दिसेल. फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखा पूर्वीपासूनच आहेत. एआय अँड डेटा सायन्स ही अभियांत्रिकीची शाखा पुणे, मुंबई, औरंगाबाद व बारामती इ. शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मागील वर्षापासून सुरू आहे. परंतु आता या शाखेस सोलापूर जिल्हयामध्ये प्रथमतः फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून परवानगी मिळाली आहे. याशाखेचा अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात आता सद्यस्थितीत व भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या शाखेच्या अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी या शाखेचे विभागप्रमुख प्रा. डॉ. तानाजी धायगुडे यांच्याशी संपर्क साधावा. (मो.नं. 9975497130, 9422321512) वेबसाईट –www.fabtecheducation.com
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…