ठाण्यात एका 25 वर्षीय महिला पोलिसावर पोलिसाकडूनच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा पोलिस ठाण्यातील रेल्वे पोलिसात आहे. लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाने हे कृत्य केले आहे.
रितेश पाटील, वय 26 असे पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून कोपरी पोलीस ठाण्यात त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हे प्रकरण पुण्याच्या वडगाव मावळ पोलीस ठाण्यात वर्ग केले जाणार आहे.
पीडित महिला पोलिस ही मुंबईतील विक्रोळी येथे वास्तव्याला आहे. तिची ओळख ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल रितेशबरोबर झाली. त्यानंतर यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
प्रेमाची सुरुवात झाल्यानंतर रिनेशने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. यातून यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.
सुरुवातीला १६ जुलै रोजी पुण्यातील वडगाव येथील एका परिसरात त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर २२ जुलैला नवी मुंबईतील सानपाडा येथील सारंग हेरिटेज लॉज येथे तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. हे सर्व झाल्यावर मात्र रितेशने लग्नास नकार दिला.
दरुम्यान महिला पोलिसाने पोलिसात रितेशविरुद्ध लैंगिक अत्याचार, फसवणूक केल्याची तक्रार ४ ऑगस्ट रोजी दाखल केली.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…