ताज्याघडामोडी

सर्वपक्षीय पंढरपुरकरांनी केली सांगली-कोल्हापूर पुरग्रस्तांसाठी मदत

सर्वपक्षीय पंढरपुरकरांनी केली सांगली-कोल्हापूर पुरग्रस्तांसाठी मदत
पंढरपूर-
नुकतीच सांगली व कोल्हापूर या भागाला महापुराचा मोठा फटका बसला असून अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. यातून अजूनही अनेकजण सावरलेले नाहीत त्या पुरग्रस्त नागरिकांना मदतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेवून पंढरपूर शहर व परिसरातील सर्वांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत पंढरपूर शहर व तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. ती मदत आज पंढरपूर विभागाचे प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिलकुमार बेल्हेकर व आपला एक महिन्याचा पगार देणारे पोलीस कर्मचारी सचिन शिंदे यांनी  या मान्यवरांच्याहस्ते साहित्याचे पूजन करून सदरची गाडी सांगली कोल्हापूरकडे रवाना करण्यात आली.
यावेळी मेडिकल असोसिएशनचे प्रशांत खलिपे, पश्चिम महाराष्ट्र कोळी महासंघाचे अध्यक्ष अरूणभाऊ कोळी, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष संदिप मांडवे, विठ्ठल कारखान्याचे संचालक सुर्यकांत दाजी बागल, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, रणजित बागल, पंढरपूर नगरपरिषदेचे मा.नगरसेवक महम्मद उस्ताद, धनाजीआबा पाटील, संतोष बंडगर, दादा थिटे, सुरज पावले, विनायक संगीतराव, गणेश परचंडे, युवराज पतसंस्थेचे चेअरमन उमेश सासवडकर, प्रशांत मलपे, राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रणव गायकवाड, शिवसेनेचे तानाजी मोरे, सचिन आटकळे, शहाजहान शेख, नानासाहेब चव्हाण, नवनाथ मोहिते, बाहुबली साळवे आदि मान्यवर उपस्थित होते.
या मान्यवरांनी दिली मदत
बी.पी.रोंगे सर, उमेश सासवडकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष सुळे, स्वागतदादा कदम, महम्मद उस्ताद, गणेश परचंडे, राजू शिंदे, डॉ.भायगुडे, प्रशांत खलिपे, मंगळवेढा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष संदिप बुरकुल, अरूणभाऊ कोळी या व काही दानशूर व्यक्तींनी नांव न सांगण्याच्या अटीवर पुरग्रस्तांना  मोठी मदत केलेली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

11 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago