ताज्याघडामोडी

दोन विहिरीमधील ५०० फूट अंतराची अट शिथिल करण्याची आ. समाधान आवताडे यांची मागणी

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना विहीर लाभसाठी लादलेली दोन विहीरमधील ५०० फूट अंतराची अट रद्द करावी या अनुषंगाने पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा आमदार समाधान आवताडे यांनी रोजगार हमी मंत्री संदीपानराव भुमरे यांच्याशी पत्रव्यवहार करून सकारात्मक प्रतिसाद मिळवला आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात जलसिंचन सुविधेच्या माध्यमातून हरितक्रांती घडून यावी म्हणून शासनाच्या वतीने सदर योजना सुरु केली होती. सुरवातीला ही योजना जवाहर विहीर योजना या नावाने सुरु होती. परंतु कालांतराने २००५ मध्ये राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या या योजेनेतून विहीर देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला या योजनेतून अल्पभूधारक, मागासवर्गीय, दारिद्र्य रेषेखाली, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी यांना सुरुवातीला या योजनेचा लाभ देण्यात आला. परंतु १७ डिसेंबर २०१७ रोजी दोन विहिरीमधील अंतर ५०० फूट व विहिरीपासून विजेचे कनेक्शन पाच खांबाच्या आत असण्याची अट घालण्यात आली. या अटींमुळे अनेक अल्पभूधारक शेतकरी यांना या योजनेचा लाभ घेता येईना. विहिरीच्या लाभासाठी दीड एकरच्या वरचा लाभार्थी पात्र ठरवला जातो. ज्या शेतकऱ्याकडे दीड एकर जमीन आहे. त्या शेतकऱ्याच्या शेजारी विहीर असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येत नाही.

परंतु दोन विहिरीमधील अंतर ५०० फूट या योजनेमुळे अनेक अल्पभूधारक शेतकरी लाभपासून वंचित राहिले. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना जलसिंचन सुविधेच्या अंतर्गत शेतात पाणी उपलब्धतेसाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ही गरज ओळखत आ. समाधान आवताडे यांनी मंत्री संदीपानराव भुमरे व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याशी पत्रव्यवहार करीत ही अट रद्द करण्याची विनंती केली. सदर मागणीची मंत्री महोदययांनी दखल घेत लवकरच यावर सकारात्मक तोडगा काढू असे आश्वासन आ. आवताडे यांना दिले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago