पुण्यात दोन व्यक्तींनी एका ज्येष्ठ नागरिकासह त्यांच्या मुलीची सोशल मीडियावर बदनामी केली आहे. या बदनामीला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली आहे. दिपाली गायकवाड असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी नितीन गायकवाड आणि रिया चव्हाण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन गायकवाड आणि त्याची मैत्रीण रिया यांची दीपालीसोबत मैत्री होती. दोघांनी विविध कारणांमुळे संगनमत करुन फिर्यादी व्यक्तीसह त्यांची मुलगी दिपाली यांच्या नावाचे वेगवेगळे फेक फेसबुक अकाऊंट तयार केले. त्यानंतर या फेक आंकाऊंटवरून अश्लील, घाणेरडे कमेन्ट करुन दीपाली आणि तिच्या वडिलांची बदनामी केली.
त्याशिवाय तिला सतत ‘तु मरुन जा, तुला कुठेच आम्ही दोघे जगु देणार नाही, तु स्वतःहुन जीव देशील, तु स्वतःचे आयुष्य संपवुन टाकशील’ असे बोलून शिवीगाळ केली.
दीपालीचा मानसिक छळ करुन तिला आत्महत्या करण्यास आरोपींनी प्रवृत्त केले. त्यामुळे दीपालीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीने गळफास घेतल्यानंतर तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान तपास करीत आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…