ताज्याघडामोडी

पत्नीचा छळ करणाऱ्या ‘त्या’ व्यवसायिका विरोधात पोलिसांची कारवाई

पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील उद्योजक नाना गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड याच्यासह पाच जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पत्नीला शाररिक आणि मानसिक त्रास देणे, जमीन बळकावणे यासह इतर गुन्ह्यात आरोपी असलेला गणेश गायकवाड आणि त्याचे वडील नाना गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुकतालयाकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

गायकवाड पिता-पुत्रांवर आठ गुन्हे दाखल

नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्यावर एकूण आठ गुन्हे दाखल आहेत.

त्यामध्ये दंगा करुन खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करुन मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, दरोडा घालणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. संबंधित गुन्हे हे पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी, सांगवी, पुणे शहरातील चतुर्श्रुंगी, चंदननगर आणि पुणे ग्रामीण पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.

सर्व आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करत वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी संघटीतपणे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि राजकारणी गणेश गायकवाड याच्यावर गंभीर आरोप आहेत. त्याने ज्योतिषी रघुनाथ येमूल याच्या सल्ल्यानुसार पत्नीवर अघोरी प्रथांचा वापर करुन छळ केला. गणेश गायकवाड याने आपल्या 27 वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार स्वत: पीडित महिलेने पोलीस ठाण्यात केली होती. पतीने अघोरी प्रकाराने ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फिर्यादी महिलेने केला होता. विशेष म्हणजे गणेश गायकवाड याची पत्नी एका माजी आमदारांची मुलगी आहे. तीन वर्षांपूर्वी 2017 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. पण येमुले गुरुच्या सल्ल्यामुळे त्यांच्या संसराचा खेळ खंडोबा झाला.

गणेश नानासाहेब गायकवाड कोण आहे?

गणेश नानासाहेब गायकवाड हा पुण्याच्या औंध परिसरात राहतो. प्रसिद्ध उद्योजक असून पाषाण आणि बाणेर परिसरात त्यांच्या अनेक मालमत्ता आहे. औंध आणि बाणेर परिसरात त्यांनी अनेक मॉल, आयटी कंपन्या, दुकाने यांना आपल्या जमिनी, दुकाने, कार्यालये भाडेतत्त्वावर दिली आहेत. यातून गणेश गायकवाड याला दरमहा अडीच ते तीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी त्याने भाजपला रामराम करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पिंपरी-चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप हे गणेश गायकवाड याचे जवळचे नातेवाईक आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

14 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago