राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल ३ ऑगस्ट रोजी अर्थातच उद्या लागणार आहे.
कसा लागेल निकाल
महाराष्ट्रात बारावीचा निकाल कधी लागणार यासंबंधीची घोषणा करण्यात आली आहे. दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात येणार आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्त्येकी 30 टक्के वेटेज आहे.
तसंच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे.
कुठे बघता येईल निकाल
बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
1. https://hscresult.11 thadmission.org.in
2. https://msbshse.co.in
3. hscresult.mkcl.org
4. mahresult.nic.in. .
5. www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…