राज्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात मागील दीड वर्षापासून कोविड -19 आजाराची साथ सुरु आहे. या कोरोना साथीच्या कालावधीत पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोविड-19 तसेच नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. ही रुग्ण सेवा अवितरपणे सुरु असून कोरोना बाधित रुग्ण तसेच इतर आजाराचे रुग्णांवर वेळेत आणि योग्य उपचार सुरु असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविद गिराम यांनी दिली.
उपजिल्हा रुग्णालयात माहे एप्रिल ते जुलै 2021 या कालावधीत पंढरपूर तालुक्यातील तसेच विविध विभागातून आलेल्या रुग्णांना सेवा देण्यात आली. यामध्ये नवजात अतिदक्षता विभागात 62 नवजात बालकांवर उपचार करण्यात आले. पुनर्वसन केंद्रातुन आठ बालकांना पोषण सेवा देण्यात आल्या. डायलेसीस विभागात 572 रुग्ण , प्रसुतीविभागात 310 प्रसुती करण्यात आल्या. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत 265 रुग्णांवर उपचार करण्यात आले. तसेच 586 एचआयव्ही संसर्गीत रुग्णांचे लसीकरण करण्यात आले तसेच 41 रुग्णांवर टीबीचे उपचार सुरु करण्यात आल्याचेही डॉ.गिराम यांनी सांगितले.
तसेच माहे एप्रिल ते जुलै 2021 या कालावधीत 4 हजार 390 जणांची कोविड आरटीपीसीआर तपासणी व 8 हजार 583 हुन अधिक संशखीत रुग्णांची रॅपीड ॲन्टीजेन तपासणी करण्यात आली. कोरोना संसर्गाच्या कालावधीत 2 हजार 500 हुन अधिक कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, कोविड रुग्णांच्या उपचारासाठी डॉ.सचिन वाळुजकर, डॉ.शिवकमल तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत. उपजिल्हा रुग्णालयास उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.प्रदीप ढेले तसेच तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन तसेच आवश्यक ते सहकार्य मिळत असल्याचेही डॉ.गिराम यांनी सांगितले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…