विविध सामाजिक उपक्रम राबवून युवा नेते अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस झाला साजरा
502 जणांनी केले रक्तदान तर ठिकठिकाणी वृक्षारोपण, व भव्य महाआरोग्य, नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन
पंढरपूर तालुक्याचे नेते आणि धाराशिव साखर कारखाना युनिट१,२,३ चे चेअरमन श्री.अभिजीत धनंजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी भव्य रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबीर, भव्य आरोग्य तपासणी शिबीर, अन्नदान, गरजू लोकांना किराणा कीट वाटप, वृक्षारोपण, कोवीड योद्धाचा सन्मान असे अनेकांनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच अनावश्यक खर्च टाळून मागील काही दिवसांत अतिवृष्टी झालेल्या सांगली, कोल्हापूर, कराड अशा पूरग्रस्त भागात नागरिकांसाठी जीवनावश्यक मदत वाढदिवसानिमित्त पाठविण्यात आली.
पंढरपूर तालुक्यात सध्या चर्चेत असलेले युवा नेते म्हणून चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वावर परजिल्ह्यात जाऊन यशस्वी तीन साखर कारखाने चालवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात आहे. काल १ ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिराची कुरोली, नांदोरे, देगाव, पंढरपूर याआदी गावात तसेच धाराशिव कारखाना युनिट१,२,३ मध्ये 502 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच पळशी,पटवर्धन कुरोली,शेळवे,देगाव,शेळवे, अनवली,फुलचिंचोली आदी गावात हजारो वृक्षांचे रोपण करण्यात आले. महा आरोग्य तपसणी शिबीर रायगड लाॅन्स भोसे येथे अयोजीत करण्यात आले.
सध्या कोविडच्या काळात ऑक्सिजनचा तुटवड्यावर देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा करणारे “ऑक्सिजन मॅन” म्हणून पाटील यांची ओळख आख्या महाराष्ट्रात झाली आहे. पंढरपूरमध्ये स्वतःच्या मल्टिप्लेक्स मध्ये चक्क कोविड सेंटर उभा करून तालुक्यातील नागरिकांना त्यांनी कोरोनाच्या प्रकोपात मोठा दिलासा दिला होता. त्यामुळे प्रत्येक कार्यात अग्रेसर असणारे अभिजीत पाटील यांनी पंढरपूरच्या राजकारणात आपली वेगळी ओळख व स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे. उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी स्वतः विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत असताना पंढरपूर शहर व तालुक्यातील हजारो युवकांना स्वयंरोजगाराची, लघुउद्योगाची वाट दाखवली आहे. शहर तालुक्यातील तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य करून अर्थकारणाच्या वाटेवर यशस्वी होण्यास प्रोत्साहित केले आहे.त्यामुळेच पंढरपूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात देखील अभिजीत पाटील यांचा मोठा प्रभाव आहे.ह्याच त्यांच्यावरील प्रेमापोटी पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे महाआरोग्य शिबिराचे अयोजन करण्यात आले होते.तसेच गोपाळपूर येथील वृद्धाश्रमात अन्नदान तर देवडे येथे धान्यवाटप करण्यात आले होते.
१ऑगस्ट रोजी अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस असताना पंढरपूर शहर व तालुक्यातील विविध ठिकाणाहून नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…