गुन्हे विश्व

तरुणीवरून सुरु झालेल्या वादाचे पर्यावसन तिघांच्या हत्येत सांगली शहरात खळबळ

तिहेरी हत्याकांडमुळे सांगली जिल्हा हादरला आहे. पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये वाद झाला आणि तो टोकाला पोहोचला. धारदार शस्त्राने वार करून एकाच वेळी तिघांची हत्या करण्यात आली आहे. तर या वादात चार जण अद्यापही जखमी आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती सांगली पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

सांगली जिल्ह्यातील दुधोंडी येथील वसंतनगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. धारधार शस्त्राने वार करुन एकाच वेळी तिघांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते अशी मृत व्यक्तींची नावं आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आली. दोन गटांमध्ये तरुणीवरून वाद सुरू होता. हे प्रकरण पोलिसांपर्यंतही गेलं होतं. या दोन्ही गटांच्या वादात पोलिसांनी मध्यस्ती करून वाद सोडवला देखील होता. मात्र पुन्हा वाद झाल्यानं हा सगळा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.

मृत्युमुखी झालेल्यांच्या संबंधीत एका मुलीवर अत्याचार झाला होता, त्याविषयी यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा राग मनात ठेवून दोन गटात वाद सुरू होता. पोलिसांनी हा वाद याआधी मिटवला होता. मात्र तरीही पूर्ववैमनस्यातून शनिवारी रात्रीही वाद झाला.

विजय मोहिते, हिम्मत मोहिते, किशोर मोहिते, आदित्य मोहिते, प्रवीण मोहिते, सचिन इनामदार यांनी येऊन हल्ला केला. या हल्ल्यात अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते यांचा खुन झाला असून यात अन्य चार जण जखमी आहेत. हल्लेखोर पसार झाले असून पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago