ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात आढळला ‘झिका’ विषाणूचा पहिला रुग्ण

महाराष्ट्र कोरोना रोगाच्या कचाट्यातून सुटत असताना महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेपुढे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. जगभरात पसरत असलेला कोरोना आणि इतर सापडलेले नवीन व्हायरस यांचा प्रतिबंध करण्यासाठी सध्या आरोग्यव्यवस्था काम करीत आहे.कोरोना रोगाची दुसरी फेज संपली असताना तिसऱ्या फेजचे संकेत सध्या मिळत आहेत. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी सध्या आरोग्य विभाग काम करीत आहे.

नुकताच कोरोना पाठोपाठ महाराष्ट्रातील एका गावात झिका नावाचा विषाणु आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली गेली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर गावात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.

त्यामुळे परिसरातील पाच किलोमीटर मधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या स्थितीला हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

बेलसर मध्ये मागील एक ते दिड महिन्यापासून डेंग्यू चिकनगुनिया आणि इतर साथीच्या रोगांनी थैमान घातले होते. त्याच अनुषंगाने एनआयव्ही (National Institute of Virology) पुणे यांनी बेलसर(ता.पुरंदर) मधील काही 51 रक्त नमुने गोळा करून ते तपासणीसाठी घेतले होते. त्यामध्ये प्रमुख्याने झिका विषाणूचा एक रुग्ण असल्याचे जाणवून आले आणि 25 चिकनगुनिया तर 3 डेग्यू चे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बेलसर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रास शनिवार (दि.31) रोजी भेट देत पाहणी केली व त्वरित पुढील उपाय-योजना करण्याचे आदेश दिले.जिल्हा आरोग्य विभाग बेलसर मध्ये दाखल झाला आहे.

झिका वायरसपासून बचाव करण्यासाठी अजून कोणतही औषध उपलब्ध नाहीये. अशात स्वत:ला डासांपासून दूर ठेवणे हा एकमात्र झिका वायरसचा धोका टाळण्याचा उपाय आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून याबद्दल पुरेपूर माहिती दिली जात आहे. या विषाणूस कोणीही घाबरून न जाता काळजी घेणे हा एकमेव पर्याय आहे. असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.विषाणूमुळे ब्राझीलमध्ये नवजात बालकांच्या मेंदूवर मोठा परिणाम दिसून आलाय. यामुळे मेदूंची वाढ अपुरी होते. त्यामुळे डॉक्टरांकडून या रोगाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे झिका विषाणू?

1947 मध्ये विषाणू सर्वप्रथम सापडला होता. सर्वप्रथम तो विषाणू आफ्रिका आणि एशिया मध्ये आढळून आला होता.

झिका वायरस ची लक्षणे:-

झिका वायरसने ग्रस्त लोकांमध्ये ताप,सांधेदुखी,अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात. ज्या लोकांना या वायरसने ग्रासले आहे त्यांनी आराम करणे गरजेचे आहे. याच्या लक्षणांमध्ये शरीरावर लाल रंगाचे चट्टेही दिसतात.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago