ताज्याघडामोडी

वेळीच सावरा अन्यथा परिस्थिती आणखी हाताबाहेर जाणार

जगाला धडकी भरवणाऱ्या करोनाचा अजूनही नायनाट करण्यात कोणत्याही देशाला यश आले नाही. त्यातच हा विषाणू रोज नवीन रूप धारण करत आणखी तीव्र होत असताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, याच करोनाच्या डेल्टा व्हेरियंटविषयी जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी पुन्हा एकदा डेल्टा व्हेरिंएटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे परिस्थिती बिघडण्यापूर्वी त्याचा प्रसार कमी करावा लागेल असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. वेगाने पसरणारा डेल्टाचा प्रकार, जो आधीच भारतात सापडला आहे, आता १३२ देश आणि प्रदेशांमध्ये आढळून आल्याचे आरोग्य संघटनेने सांगितले.

डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. ‘डेल्टा एक धोक्याचा इशारा आहे. हा एक इशारा आहे की हा व्हायरस पसरत आहे, पण याचे अधिक धोकादायक रूप समोर येण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यावा लागेल असे त्यांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी ही याबाबत भाष्य केले आहे. ‘आतापर्यंत, चार चिंताजनक करोना व्हायरसचे प्रकार समोर आले आहेत आणि व्हायरस पसरत राहिल्याने आणखी येत राहतील. डब्ल्यूएचओच्या सहापैकी पाच क्षेत्रांमध्ये, गेल्या चार आठवड्यांत सरासरी संसर्ग ८० टक्क्यांनी वाढला आहे, असे टेड्रॉस म्हणाले.

रायन म्हणाले की, जरी डेल्टाने अनेक देशांना हादरवून टाकले असले तरी, त्याचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी उपाय अजूनही आहेत. विशेषतः सोशल डिस्टसिंग पाळणे, मास्क घालणे, हाताची स्वच्छता याद्वारे डेल्टाचा प्रसार टाळता येऊ शकतो. ‘व्हायरस फिटर झाला आहे, व्हायरस वेगाने वाढच आहे. करोना रोखण्यासाठी हे उपाय अजूनही काम करत आहे, पण आपल्याला आधीपेक्षा अधिक कार्यक्षम आणि अधिक प्रभावीपणे हे उपाय अंमलात आणण्याची गरज आहे,’ असे रायन म्हणाले.

करोना रुग्णांची वाढती संख्या भारतातील तिसऱ्या लाटेचे कारण बनत असताना, डेल्टा प्रकार जगातील अनेक देशांमध्ये करोनाच्या चौथ्या लाटेचे कारण बनत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की करोनाच्या डेल्टा प्रकाराने मध्य-पूर्व देशांमध्ये चौथ्या लाटेचे स्वरूप घेतले आहे आणि करोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये तीव्र वाढ झाली आहे. मध्यपूर्वेतील देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण खूप कमी आहे.

ग्लोबल हेल्थ ऑर्गनायझेशनने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की डब्ल्यूएचओच्या पूर्व भूमध्य प्रदेशातील डेल्टा व्हेरिएंटमुळे करोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे आणि हे व्हेरियंट करोनामुळे मृत्यू होत आहे. या क्षेत्रातील २२ पैकी १५ देशांपैकी आतापर्यंत करोनाची चौथी लाट येत असल्याचे चित्र आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago