पंढरपूर शहरात गेल्या काही दिवसात सातत्याने चोरीचे प्रकार उघडकीस येत असून दुचाकी चोरीस जाण्याच्या प्रमाणात तर लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते.दुचाकी चोरट्याबरोबरच आता पंढरपुरात चेन स्न्याचर देखील वावरू लागले असावेत अशी शंका काल शनिवारी घडलेल्या घटनेवरून व्यक्त होत असून शुक्रवार दिनांक ३० जुलै रोजी भर दुपारी शहरातील भर ठिकाण असलेल्या घोंगडे गल्ली परिसरात महिलेच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून वेगात आलेल्या चोरटयांनी हिसका मारून लंपास करत सुसाट वेगाने निघून गेले आहेत.
या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात राजश्री संतोष भाळवणकर वय-45वर्षे, धंदा-घरकाम, रा.घोंगडे गल्ली, पंढरपूर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी या एका धार्मिक कार्यक्रमासाठी जाऊन घरी परतत असताना दुपारी 4/45वाजण्याचे सुमारास एका काळ्या रंगाच्या उंच शिट असलेल्या मोटारसायकलवर अंगावर काळे जर्कींग व काळे हेल्मेट घातलेले दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या गळ्यातील मिनी गंठण हिसडा मारून नाथ चौकाकडे भरधाव वेगात जावू लागताच फिर्यादीने मोठ्याने ओरडताच तेथील शामसुंदर भालचंद्र कोरडे व सागर नारायण खंडागळे यांनी चोरट्याना पडकण्यासाठी धाव घेतली परंतू ते दोन अनोळखी इसम आपले मोटारसायकल वरुन जोरात निघून गेले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दिवस वाईट आलेत,चोरट्यांची भीती वाढली आहे त्यामुळे महिला वर्गाने बाहेर जाताना दागिने घालूच नयेत अशी चर्चा होताना दिसून येत आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…