ताज्याघडामोडी

युवा नेते अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

 

 

प्रतिनिधी:- धाराशिव साखर कारखाना युनिट १,२,३ चे चेअरमन श्री.अभिजित धनंजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी भव्य रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबीर, भव्य आरोग्य तपासणी शिबीर, अन्नदान, गरजू लोकांना किराणा कीट वाटप, वृक्षारोपण, कोवीड योद्धाचा सन्मान असे अनेकांनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अनावश्यक खर्च टाळून मागील काही दिवसांत अतिवृष्टी झालेल्या सांगली, कोल्हापूर, कराड अशा पूरग्रस्त भागात नागरिकांसाठी जीवनावश्यक मदत वाढदिवसानिमित्त पाठविण्यात येणार आहे. 

पंढरपूर तालुक्यात सध्या चर्चेत असलेले युवा नेते म्हणून चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वावर परजिल्ह्यात जाऊन यशस्वी साखर कारखाने चालवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.सध्या कोविडच्या काळात ऑक्सिजनचा तुटवड्यावर देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा करणारे “ऑक्सिजन मॅन” म्हणून पाटील यांची ओळख आख्या महाराष्ट्रात झाली आहे.

पंढरपूरमध्ये स्वतःच्या मल्टिप्लेक्स मध्ये चक्क कोविड सेंटर उभा करून तालुक्यातील नागरिकांना त्यांनी कोरोनाच्या प्रकोपात मोठा दिलासा दिला होता. त्यामुळे प्रत्येक कार्यात अग्रेसर असणारे अभिजीत पाटील यांनी पंढरपूरच्या राजकारणात आपली वेगळी ओळख व स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे.

उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी स्वतः विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत असताना पंढरपूर शहर व तालुक्यातील हजारो  युवकांना स्वयंरोजगाराची, लघुउद्योगाची वाट दाखवली आहे. शहर तालुक्यातील तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य करून अर्थकारणाच्या वाटेवर यशस्वी होण्यास प्रोत्साहित केले आहे.त्यामुळेच पंढरपूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात देखील अभिजीत पाटील यांचा मोठा प्रभाव आहे.

विकासाच्या वाटेवरील राजकारणच सवर्सामान्य जनतेच्या तरुणांच्या जीवनात बदल घडवून आणू शकते हि संकल्पना घेऊन तरूणाईला दिशा दाखवणारे आहे अशी भूमिका मांडत ते शहर व तालुक्यात प्रचंड लोकप्रिय नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत.     

१ऑगस्ट रोजी अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस असताना शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन करून अभिजीत पाटील यांनी दाखविलेल्या जनसेवेतून लोकहितासाठी वाटचाल करून उपक्रम करीत असल्याचे धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी माहिती दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

8 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago