पंढरपुरातील प्रसिद्ध डीव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन,धाराशिव साखर कारखाना युनिट १,२,३ चे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी भव्य रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबीर, अन्नदान, गरजू लोकांना किराणा कीट वाटप, वृक्षारोपण, कोवीड योद्धाचा सन्मान आदी अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तर सांगली,कोल्हापूर भागात पूरग्रस्त नागिरकांसाठी जीवनावश्यक मदत पाठविण्यात येणार आहे.
चेअरमन अभिजित पाटील यांनी आपल्या विधायक आणि लोकहिताच्या कार्यपद्धतीमुळे प्रचंड लोकप्रियता प्राप्त केली आहे.डीव्हीपी उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी त्यांनी स्वतः विविध उद्योगात यशस्वी वाटचाल करीत असताना पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक युवकांना स्वयंरोजगाराची,लघुउद्योगाची वाट दाखविली आहे.शहर तालुक्यातील तरुणांना प्रसंगी वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य करून अर्थकारणाच्या वाटेवर यशस्वी होण्यास प्रोत्साहित केले आहे.आणि त्यामुळेच पंढरपूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात देखील अभिजित पाटील यांचा मोठा प्रभाव वाढत चालल्याचे दिसून येते.विकासाच्या वाटेवरील राजकारणच सवर्सामान्य जनतेच्या तरुणांच्या जीवनात बदल घडवून आणू शकते हि संकल्पना घेऊन अभिजित पाटील हे राजकीय आघाडीवर मांडत असलेल्या भूमिकेमुळे ते शहर व तालुक्यात प्रचंड लोकप्रिय नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत.
१ ऑगस्ट रोजी अभिजित पाटील यांचा वाढदिवस साजरा करताना शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन करून अभिजित पाटील यांनी दाखविलेल्या लोकहिताच्या वाटेवरच वाटचाल करीत असल्याची साक्षच त्यांचे समर्थक,मित्रमंडळी आणि तरुणाई देताना दिसून येणार आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…