शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख आ.तानाजी सावंत,जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुर विभागात शिवसंपर्क अभियान राबिवण्यास सुरुवात झाली पंढरपूर तालुक्यात आज भोसे येथील यशवंत सभागृह येथे करण्यात आला. यावेळी या जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेचे कार्य,शिवसेनेच्या पुढाकाराने व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना घरघरात,गावागावात पोहोचवा असे आवाहन शिवसैनिकांना केले.यावेळी बोलताना ते म्हणाले कि,शिवसैनिकांची सदस्य नोंदणी करणे,विविध गावात नवीन शाखा स्थापन करणे,शिवसेना प्रणित महिला आघाडी,युवा सेना यांच्या शाखा वाढविणे,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता मतदारांची नोंदणी करणे आदी उपक्रम राबिवण्यात येणार आहेत.
शिवसंपर्क अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने शिवसेना तालुका प्रमुख महावीर देशमुख यांनी यावेळी मार्गदर्शन करताना शिवसैनिकांनी आपल्या भागातील सर्वसामान्य नागिरकांच्या समस्या समजावून घेताना कोरोनाच्या लसीकरणाबाबत येणाऱ्या अडचणी,कोरोना काळात राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे स्वस्त धान्य मिळाले का?,आधार कार्ड नसेल तर ते काढण्यात येणाऱ्या अडचणी दूर करणे,विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी सहकार्य करणे या बरोबरच त्या त्या गावातील नागिरकांच्या प्रमुख समस्या जाणून घेण्यात याव्यात यासाठी हे शिवसंपर्क अभियान राबिवण्यात येत असल्याचे सांगत शिवसैनिकांनी याबाबत दक्षता घेण्याची सूचना केली.
यावेळी शिवसेनेचे विविध पदाधिकारी,शाखा प्रमुख आणि शिवसैनिक भोसे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात प्रत्येक वाडीवस्तीवर,गावागावात,घराघरात जाऊन शिवसेनेची भूमिका समजावून सांगणार आहेत तर अनेक ठिकाणी नव्याने शिवसेना शाखा स्थापण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,तालुका प्रमुख महावीर देशमुख,जेष्ठ शिवसैनिक भगवानदादा जमदाडे,विभाग प्रमुख प्रशांत जाधव,गटप्रमुख शुभम चव्हाण,शाखा प्रमुख विलास कोरके,सुहास तळेकर,महेश सुरवसे,नागनाथ सुरवसे,उमेश घोडके,पांडुरंग सावंत,कुमार शेळके,नागनाथ माळी यांच्यासह शिवसेनेचे भोसे जिल्हा परिषद गटातील विविध पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…