ताज्याघडामोडी

माझी प्रकृती उत्तम, काळजी करण्याचे कारण नाही, रुग्णालयातून जयंत पाटील यांचं ट्विट

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची बैठक अर्धवट सोडून मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले होते. अस्वस्थ वाटत असल्यामुळे जयंत पाटील यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले होतं. जयंत पाटील यांनी आपली प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही असे ट्विट करुन प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. दरम्यान नियमीत तपासणीसाठी रुग्णालयात गेलो असल्याचे जयंत पाटील यांनी ट्विट करुन सांगितले आहे. जयंत पाटील यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपेही रुग्णालयात उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्यमंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले. यामुळे त्यांनी मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून रुग्णालयात धाव घेतली. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जयंत पाटील यांना दाखल केले आहे. जयंत पाटील यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सतेज पाटील रुग्णालयात उपस्थित होते.

रुग्णालयातून जयंत पाटील यांचं ट्विट

दरम्यान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करुन प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटल आहे की, “आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद” असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

पूर परिस्थितीचे नियोजन

राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील रात्रंदिवस आढावा घेऊन उपाययोजना करत होते. पूर परिस्थीतीवर कोयना नदी आणि अलमट्टी धरणातील पाण्याच्या नियोजनाची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर टाकण्यात आली होती. जयंत पाटील मध्य रात्री आणि प्रवासादरम्यानही अधिकाऱ्यांना फोन करुन माहिती घेत होते तसेच दक्ष राहण्याचे आवाहन करत होते. कोल्हापूर सांगली पूरपरिस्थितीवर जयंत पाटील नियंत्रण ठेवून धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत निर्णय घेत होते. जयंत पाटील यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाचाही दौरा केला होता. यावेळी त्यांनी पाण्यात उतरुन परिस्थितीचा आढावा घेतला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

स्वेरीमध्ये ‘नॅशनल एज्युकेशन डे’ उत्साहात साजरा

पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…

2 days ago

पंढरपुरात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक,लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांची सेवा उपलब्ध

लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक…

6 days ago

स्वेरीमध्ये अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरसाठी नीति आयोगाबरोबर सामंजस्य करार

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…

1 week ago

येत्या शनिवारी स्वेरीत माजी विद्यार्थी मेळावा आणि पदवीप्रदान समारंभ

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता व व्हिजन तंत्रज्ञानावर चर्चा

पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago