राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कॅबिनेट बैठकीदरम्यान प्रकृती बिघडली असून त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कॅबिनेटची बैठक सुरू असताना त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना बैठक अर्धवट सोडून रुग्णालयात नेण्यात आले. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तातडीनं ईसीजी करण्यात आलं असून पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जयंत पाटीलांसोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. माहिती मिळताच विद्या चव्हाण देखील ब्रिच कॅण्डी रुग्णालयात आल्या आहेत.
पोलिसांचा बंदोबस्त ब्रिच कॅण्डी रुग्णालय परिसरात वाढवण्यात आला आहे. जयंत पाटील यांची तब्येत सध्या स्थिर आहे. जयंत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबक कोल्हापूरचा दौरा केला होता.
जयंत पाटील यांच्या ट्विटरवरून देखील प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. जयंत पाटील म्हणाले, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सूचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…