ताज्याघडामोडी

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास मदतीचा हात अमेरिकेतून पोहोचली मदत

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास मदतीचा हात

अमेरिकेतून पोहोचली मदत

 

 

          पंढरपूर दि. 28 :-  उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे  गरजू, गरीब कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येतात.  रुग्णांच्या उपचारासाठी सायकॉन कन्सल्टंटचे रमेश लोकरे आणि स्वाती यलमार (कन्सास, अमेरिका) तसेच  एन.राचमले फाऊंडेशन (अमेरिका)  यांच्या सौजन्याने बालरोग तज्ञ डॉ.आरदवाड यांनी उपजिल्हा रुग्णालयास दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर व दोन पोर्टेबल व्हेन्टींलेटर देण्यात आले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम यांच्याकडे कॉन्संट्रेटर व पोर्टेबल व्हेन्टींलेटर सुपुर्द करण्यात आले.

 पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये पंढरपूर तालुक्यातील तसेच मंगळवेढा सांगोला, माळशिरस, मोहोळ परिसरातील कोरोना बाधित रुग्ण  उपचार  घेतात. या ऑक्सिजन कॉन्संट्रेटर व पोर्टेबल व्हेन्टींलेटरमुळे उपजिल्हा रुग्णालयात देण्यात येणाऱ्या उपचाराच्या  सुविधेत  भर पडली असून याचा उपयोग गरीब व गरजू रुग्णांना करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.गिराम  यांनी दिली. सायकॉन कन्सल्टंट व एन.राचमले फाऊंडेशन  अमिरीकेत वास्तव्यास असलेल्या भारतीयांची संस्था असून, या संस्थेमार्फत कोरोना कालावधीत अनेक रुग्णालयांना मदत केली  आहे.

 सदर मदत सुपुर्द करतेवेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम, डॉ.भातलवंडे तसेच लातुरचे संजय आयचित उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

7 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago