*चिंचणीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटनः आ.सुभाष देशमुख,आ.बबनदादा शिंदेंची उपस्थिती*
पंढरपूर ः चिंचणी पुर्न(ता.पंढरपूर ) येथे जिल्हा परिषद शाळा वर्गखोल्या,कर्मवीर भाऊराव पाटिल अभ्यासिका,पर्यटन रेस्टहाऊसयासह विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार सुभाषबापू देशमुख व आमदारा बबनदादा शिंदे यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना आमदार बबनदादा शिंदे यांनी शासकीय योजनांच्या निधीचा वापर 100%योग्य प्रकारे झाल्यानेच आज चिंचणी प्रगतीपथावर असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले.यावेळी आमदार निधीतून या निसर्गसंपन्न गावास पुस्तकांचे गाव बनविण्यासाठी तीन लाख रुपयांचा निधी देणार आसल्याचे सांगितले .चिंचणीचा सामावेश केंद्र सरकारच्या पर्यटन यादीत सामावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले .
अध्यक्षपदावरुन बोलताना आमदार सुभाषबापू देशमुख यांनी आपल्या गावच्या विकासाचे मार्केटिंग आपणच करुन जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्याचे व सेंद्रिय उत्पादन वाढविण्याचे अवाहन केले.गावागावात विकास कामाच्या स्पर्धा लागायला हव्यात असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी काॕम्रेड मोहन अनपट यांनी कृषी पर्यटन व पुस्तकांचे गाव असणार्या चिंचणीच्या विविध उक्रमांची माहिती दिली. आभार चंद्रकांत पवार, शशिकांत पाटिल तर सुत्रसंचालन समाधान काळे यांनी केले .
यावेळी माजी सभापती दिनकर नाईकनवरे, युवकनेते प्रणव परिचारक, समाधान काळे,गटविकास अधिकारी सुरेंद्र पिसे,विस्तारअधिकारी डाॕ.बिभिषण रणदिवे,अभियंता समारिया,सरपंच मुमताज शेख ,बाळासाहेब काळे व मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
फोटोः चिंचणी( ता.पंढरपूर ) येथील विविध विकास कामांचे उद्घाटन करताना आमदार सुभाषबापू देशमुख,आमदार बबनदादा शिंदे,मोहन अनपट,समाधान काळे,बीडीओ सुरेंद्र पिसे व मान्यवर
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…